दोडाईचा रोटरी क्लब ऑफ धुळेच्या वतीने धुळे येथे हॉटेल गणपती पॅलेस सभागृहात पर्यावरण व वन्यजीवांवर आधारित घेण्यात येणाऱ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी संघाने प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची फेब्रुवारीत मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.
विदयार्थ्यांमध्ये पर्यावरण व वन्यजीवांविषयी जाणीव विकसित होण्याच्या दृष्टीने घेण्यात येणाऱ्या या अभिनव स्पर्धेत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शाळांतील 37 संघात एकूण 110 विद्यार्थी सहभागी झाले होते.37 संघातून उपांत्य फेरीत निवड करण्यात आलेल्या 6 संघात रोटरी स्कूलच्या अथर्व चोंढाळकर, यशराज धनगर, वैभव पाटील यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला असून मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत निवड करण्यात आली.विजेत्या संघाला रोटरी क्लब ऑफ धुळेचे अध्यक्ष आशिष अग्रवाल, सेक्रेटरी राहुल कुलकर्णी, प्रोजेक्ट चेअरमन कुंतल अग्रवाल, राहुल अग्रवाल व रोटरी पदाधि-यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. रोटरी स्कूलचे विद्यार्थी अशा विविध स्पर्धेत आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवून आपले स्थान निश्चित करतात. या विद्यार्थ्यांना विज्ञान विभागप्रमुख मोनाली मिस्तरी, सुचेता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी विद्यार्थी संघाचे संस्थाध्यक्ष हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. राजेश टोणगांवकर संचालक पी.सी. शिंदे, प्राचार्य एम.पी. पवार यांनी अभिनंदन व कौतुक करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
