शिरपुर (प्रतिनिधी):- अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार सुखपालसिंगजी खेरा यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष परागजी पाष्टे साहेब,धुळे जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष श्यामकांतजी भामरे,धुळे जिल्हा किसान काँग्रेस महिलाध्यक्षा सौ.जयश्रीताई खैरनार, काँग्रेस आयचे दुसाने (साक्री) मा.सरपंच श्री खैरनार, यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.९ जनवरी २०२३, सकाळी११ वाजता शिरपुर शहरांत कांग्रेस भुवन येथे किसान काँग्रेस च्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.तालुक्यातील शेतकरी बंधु, आजी माजी ग्राम पंचायत सरपंच व सदस्य,युवक काँग्रेस, महिला काँग्रेस,अल्पसंख्यांक सेल,काँग्रेस सेवादल,आदिवासी आघाडी,सर्व फ्रंट व सर्व सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरूवातीला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.आजच्या सभेत किसान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पराग पाष्टे साहेब यांच्या हस्ते शिरपूर तालुका किसान काँग्रेस अध्यक्ष पदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक मोहननाना पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच धुळे जिल्हा किसान काँग्रेस उपाध्यक्षपदी ॲड.गोपालसिंह राजपूत,शिरपुर तालुका उपाध्यक्षपदी प्रकाशसिंह जमादार, सचिव पदी भरतभाऊ रोकडे, खजिनदार हिरालाल मंगा माळी,सदस्यपदी अनंत शिवाजी सांळुखे, देविदास पाटील सर, लक्ष्मण पावरा,अविनाश विक्रम पाटील, बापु धनगर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांपैकी प्रास्ताविक शहर कांग्रेस अध्यक्ष उत्तमबापू माळी यांनी केले.प्रदेश कांग्रेस सचिव श्री रणजीत अण्णा पावरा, प्रदेश किसान काँग्रेस अध्यक्ष श्री पराग पाष्टे,दुसाने (साक्री) चे मा.सरपंच श्री खैरनार यांनी मार्गदर्शन पर भाषण केले.आणि काँग्रेस पक्ष हा फक्त एक पक्ष नसून एक सामाजिक चळवळ आहे.ती संपूर्ण भारतात पसरलेली आहे. मा.राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो आंदोलन' पदयात्रेला अत्यंत महत्त्व आले आहे.ही यात्रा यशस्वी होण्यासाठी स्वतः जनता त्यांत सामिल झाली होती.शेतक-यांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे उभे राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी सध्दा सदैव उभे राहूअसे प्रतिपादन केले.नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष ॲड.गोपालसिंह राजपूत व तालुकाध्यक्ष मोहन साहेबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, तालुक्यातील शेतकऱ्यांचे बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.त्याकरिता सर्वांचे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. याप्रसंगी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अभिमन भोई पैलवान, धुळे शहर महिला कांग्रेस अध्यक्ष बानुबाई शिरसाठ ,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अरुणभाऊ दलाल, अल्पसंख्याक सेलचे आसिफ शेख,ॲड.विजय तिवारी वनावल चे वि.का.सोसायटी चेअरमन व सदस्यांसहित वनावलचे शेतकरी बंधु व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचलन अजय पाटील यांनी व शेवटी आभार प्रदर्शन कांग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहरबापू पाटील यांनी केले.नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
किसान काँग्रेस च्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.गोपालसिंह राजपूत,शिरपूर तालुकाध्यक्षपदी मोहननाना पाटील व सचिवपदी भरतभाऊ रोकडे यांची स्तुत्य निवड!
byMahendra Rajput
-
0
