शिरपूर : एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाला "उत्कृष्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार" देऊन "स्टार एज्युकेशन अवॉर्ड 2023" द्वारे वरळी, मुंबई येथे सन्मान करण्यात आला.
स्टार एज्युकेशन अवॉर्ड 2023 या संस्थे मार्फत शिरपूर येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाला धुळे विभागातील उत्कृष्ट इन्स्टिट्यूट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार वरळी, मुंबई येथील नेहरू सेंटर येथे महाविद्यालयाचे रजिस्टार संजय बागुल यांनी स्वीकारला.
उत्कृष्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार हा मेंटर मेंटई स्थापना, निवासी सुविधा आणि वसतिगृह जीवन, शिस्त आणि परिसर जीवन, मानसिक आरोग्य आणि कल्याण, संस्थात्मक मूल्ये आणि विशिष्टता या विविध मापदांडच्या आधारे मूल्यमापन करून प्रदान करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी दिली.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उद्योगपती चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील व सर्व संचालक यांनी कौतुक केले.
सदर मानांकनाने अजून एक मनाचा तुरा महाविद्यालयाच्या शिरपेचात रोवला गेलाय तसेच महाविद्यालय हे राष्ट्रीय स्तरावरील एन. बी. ए., आय. एस. ओ.९००१:२००८ मानांकित व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून “अ” दर्जा व ग्लोबल इम्पॅक्ट रँकिंग मध्ये स्थान प्राप्त महाविद्यालय असून आतापर्यंत महाविद्यालयाला विविध शासकीय व निमशासकीय विभागांकडून सुमारे २.५० कोटींच्या वर संशोधन निधी प्राप्त झाला आहे.
महाविद्यालया कडून सुमारे ५०० च्या वर शोधनिबंध व २० पुस्तके विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रिकांत प्रकाशित झालेले आहेत. महाविद्यालयाकडून एकूण ५ पेटंट अर्ज जमा झाले असून एका पेटंटला भारत सरकारची मान्यताहि मिळाली आहे. महाविद्यालयात अत्याधुनिक उपकरणे व सोयी सुविधांनी सज्ज असलेली “अतिसूक्ष्म प्रयोगशाळा” उभारण्यात आली आहे. त्यात नॅनो टेक्नॉलॉजी, कर्करोग, अल्झायमर वगैरे संबंधित संशोधनासाठी लागणारे एस.पी. आर. स्पेक्ट्रोमीटर, स्पेक्ट्रोफ्लुरोमीटर, पार्टिकल साईझ अनालईझर इत्यादी अद्यावत उपकरणे उपलब्ध आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करणे महाविद्यालयात सहज शक्य झाले आहे. ट्रोईका फार्मासुटीकल्स, अहमदाबाद यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट पदव्युत्तर शोध प्रबंधासाठीचा रजनीभाई व्ही. पटेल पुरस्कार सलग तिसऱ्यांदा महाविद्यालयाला मिळाला आहे.
भारतातील विविध महाविद्यालयातून शेकडो संशोधक या स्पर्धेत सहभागी होतात व त्यातून उत्कृष्ट्ट अश्या प्रबंधाला पारितोषिक देवून गौरविण्यात येते. “अविष्कार” ही संशोधन स्पर्धा जिल्हा, विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तर अश्या विविध पातळींवर दरवर्षी घेण्यात येत असते त्यात अशीच यशाची परंपरा कायम ठेवत महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना व संशोधनाच्या आधारे सलग सात वर्षांपासून विविध पातळींवरील पारितोषिकांवर शिक्कामोर्तब करीत सदर स्पर्धेत महाविद्यालयांने विविध विषयातील सर्वाधिक पारितोषिके पटकावून विद्यापीठात नावलौकिक मिळवलाय. तसेच २०२० चे विद्यापीठाचे फार्मसी शाखेतील सुवर्णपदकाचा मान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने पटकावलाय.
महाविद्यालयातर्फे “समाज उपयोगी संशोधनाला” नेहमीच प्राधान्य दिले जावून समाज उपयोगी संशोधन केले जाते. त्यात समुद्राच्या पाण्यातून गोड पाण्याची निर्मितीचा प्रयोग, मक्याच्या कानिसापासून बनविलेले जलशुद्धीकरण उपकरण, कमी पाण्यातून शेती सिंचन, नॅनो टेक्नॉलॉजी, फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी जैव-संवेदानायुक्त निदान व उपचार पद्धती इत्यादींचा समावेश आहे. महाविद्यालयातर्फे आरोग्याशी निगडीत विविध प्रकल्प व शिबिरांचे एन. एस. एस. च्या माध्यमातून नियमित आयोजन केले जाते. त्यामध्ये, मोफत रक्तगट व आरोग्य तपासणी शिबीर, सिकेलसेल निदान शिबीर, मासिक पाळी जनजागृती अभियान, स्तनपान मार्गदर्शन शिबीर, कुटुंब नियोजनाबद्दल जनजागृती तसेच मधुमेह, अवयव दान, ग्रामीण आरोग्य व्यवस्था, आत्महत्याप्रतिबंध यावरील चर्चासत्रे, पथनाट्ये व जनजागृतीपर रँली यांचा समावेश आहे व ११ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्पायर कॅम्प आयोजित करणारे महाराष्ट्रातील एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. तसेच महाविद्यालयाचा ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उदिष्टाने नियमित कॅम्पस इंटरव्ह्यूचेहि आयोजन करत असते. तसेच महाविद्यालयाचे बहुतांश माजी विद्यार्थी हे यु. एस., कॅनडा, दुबई, यु. के. इत्यादी देशात कार्यरत असून त्यांची मार्गदर्शन सत्रे विद्यमान विद्यार्थ्यांसाठी नेहमी आयोजित केली जातात. सदर प्रक्रियेत महाविद्यालयाचे रजिस्टार संजय बागुल व त्यांच्या सहकार्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
