पुणे:उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.
येत्या ४८ तासात धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिह्यातील काही भागात तीव्र थंडीची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच पुणे, नगर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव जिह्यातील काही भागात देखील थंडीची लाट दाट असण्याची शक्यता आहे.
गोंदीयात रविवारी या मोसमातील किमान ७ अंश सेल्सियस या नीचांकी तापमानाची नोंद झाली.
तर नागपुरात किमान ८.५ अंश सेल्सियस इतके कमी तापमान नोंदवण्यात आले.
विदर्भातील तापमानात सरासरी २ अंशाने घट झाल्याने थंडीने गारठून गेले आहे.
मात्र ही थंडी ३१ जानेवारीपर्यत राहील.
त्या नंतर पूर्वेकडून तसेच दक्षिण-पूर्वेकडून येणाया वायांमुळे थंडी कमी होत जाईल, असे प्रादेशिक हवामान पेंद्राच्या सूत्रांनी सांगितले.
.jpeg)