जि प शाळा जुने आच्छी ता शिंदखेडा जि धुळे या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी तरुल गणेश नागरगोजे हिने जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तरूलने 298 पैकी 258 गुण मिळवत धुळे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या सराव परीक्षाचा विद्यार्थ्यांना लाभ झाला.
विशेष म्हणजे सन 2022 मध्ये तरुलने जानेवारी 22 मध्ये घेण्यात आलेल्या AISSEE परीक्षेत 300 पैकी 259 गुण मिळवून (महाराष्ट्र राज्यातून मुलींमधून चौथी) सैनिकी स्कूल चंद्रपूर येथे प्रवेशास पात्र
त्यानंतर एप्रिल 22 मध्ये घेण्यात आलेल्या JNVST परीक्षेत जवाहर नवोदय विद्यालय धुळे येथे निवड व जुलै 22 मध्ये घेण्यात आलेल्या (PUP 5th) शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून तिने यशाची हॅट्रिक साधली आहे. या यशाबद्दल तिचे मा.डॉ, सि. के.पाटील गटशिक्षणाधिकारी शिंदखेडा, श्रीमती शैलजा शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी, श्री ,जगदीश पाटील केंद्र प्रमुख तसेच सर्व स्तरातून कौतुक होत आहे तरुल ही जि.प. शाळा दरखेडा चे मुख्याध्यापक श्री गणेश नागरगोजे व शिक्षिका सौ ताई नागरगोजे यांची मुलगी आहे.हे यश मिळवण्यासाठी तिला शाळेचे मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
