ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा प्र न ता शिंदखेडा जि धुळे येथे हिंदवी स्वराज्य संस्थापिका राजमाता जिजाऊ व मराठी पत्रकारीतेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.एन. पी. भिलाणे व श्री नितीन पाटील सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा
कु.रिया सुरेश पेंढारकर या विद्यार्थिनीने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची वेशभूषा देवेश रवींद्र धनगर या विद्यार्थ्याने साकारली .
राजमाता जिजाऊ यांचा जीवन परिचय व त्यांच्या विचारांची आजच्या पिढीला गरज आहे.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकार क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल माहिती श्री. एन. पी. भिलाणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री नितीन पाटील यांनी व्यक्त केले.
