माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवासेना शिरपूर चा सामाजिक बांधिलकीतुन भाटपुरा गावात साडी वाटप

 



 .
 शिरपूर - माँसाहेब मीनाताई ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी तमाम शिवसैनिकांसाठी आदरस्थान आहेत. या दिवशी शिवसैनिक ममता दिवस म्हणून साजरा करतात. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाटपुरे गावातउप तालुकाधिकारी युवा सेना जितेंद्र राठोड यांच्या प्रयत्नाने भाटपुरे गावातील मातांना साडी वाटप. या शिवसेनेच्या पदाधिकारीनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळेस तमाम शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते शिरपूर तालुक्याचे माजी व प्रथम तालुकाप्रमुख आनंद बापू चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र राठोड शिवसेना युवासेना पदाधिकारी भाटपुरा ईश्वर राठोड,मयुर पाटील, विशाल देवरे यांनी केले. अतुल्य सहकार्य माझी डेप्युटी सरपंच संजय भील,माझी ग्रामपंचायत सदस्य आप्पा भिल, सुनिल भील तसेच युवकांनी केले. यावेळेस माजी तालुकाप्रमुख आनंद बापू चौधरी, उपजिल्हा प्रमुख शिवसेना भरतसिंग राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू सिंग राजपूत, उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा, उपतालुका प्रमुख प्रदिप राजपूत, वरिष्ठ शिवसैनिक पिंटु शिंदे,एन डी पवार , विभाग प्रमुख युवासेना ईश्वर राठोड , शिवसैनिक व भव्य संकेत नागरिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने