शिरपूर : शिक्षण विभाग पंचायत समिती शिरपूर, तालुका मुख्याध्यापक संघ, तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ व आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय भामपूर ता. शिरपूर जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने स्तरीय विज्ञान ४३ वे शिरपूर तालुका विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन समारंभ १२ ते १३ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित भामपूर येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे.
उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक १२/१/२०२३ रोजी ११ वाजता विज्ञान प्रदर्शन उद्घाटन शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल चंदुलाल भंडारी यांच्या हस्ते तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले (जि. प. धुळे) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख अतिथी प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे (जि. प. धुळे), आबा महाजन (तहसिलदार, शिरपूर), किसान विद्या प्रसारक संस्था सचिव निशांत रंधे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, आर. व्ही. पाटील (अध्यक्ष धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघ), उदय. डी. तोरवणे (सचिव धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघ), डी. ए. चौधरी (उपाध्यक्ष धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघ), श्रीमती वासंती पवार (संपर्क शकारी संपर्क अधिकारी जि. प. धुळे), सुधाकर एकनाथ बागुल (विज्ञान पर्यवेक्षक जि. प. धुळे), पी. झेड. कुंवर (अध्यक्ष धुळे जिल्हा गणित व विज्ञान अध्यापक संघ), संजय लोटन पवार (धुळे जिल्हा गणित व विज्ञान अध्यापक मंडळ) उपस्थित राहतील.
पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार १३/१/२०२३ रोजी दुपारी २ वाजता शिरपूर प्रांताधिकारी प्रमोद भामरे व एस. टी. सोनवणे (गटविकास अधिकारी, पं. स. शिरपूर) यांच्या हस्ते तसेच शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. प्रमुख अतिथी शिरपूर शहर पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, किसान विद्या प्रसारक संस्था खजिनदार श्रीमती आशाताई रंधे, शिरपूर पीपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी, के. डी. बच्छाव (उपाध्यक्ष गणित व विज्ञान अध्यापक संघ), प्राचार्य पी. व्ही. पाटील (कार्यकारिणी सदस्य धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघ), डॉ. मनोज निकम (सेवा हॉस्पिटल, शिरपूर) हे उपस्थित राहतील.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एफ. के. गायकवाड, शिरपूर तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष एस. एन. बोरसे, आर. सी. पटेल माध्य. विद्यालय, भामपूरचे मुख्याध्यापक व्ही. पी. दीक्षित, आर. एन. पवार (सचिव तालुका मुख्याध्यापक संघ), निलेश देसले (अध्यक्ष शिरपूर विज्ञान व गणित अध्यापक संघ), श्रीमती डॉ. निता सोनवणे (शिक्षण विस्तार अधिकारी), आर. के. गायकवाड (शिक्षण विस्तार अधिकारी), ई. बी. आव्हाड (शिक्षण विस्तार अधिकारी), श्रीमती मनिषा वानखेडे (शिक्षण विस्तार अधिकारी), डी. पी. बुवा (शिक्षण विस्तार अधिकारी), बी. एस. बुवा (शिक्षण विस्तार अधिकारी) यांनी केले आहे.
