आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या ९ विदयार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट द्वारे टेक महिंद्रा कंपनीत निवड

 



शिरपूर : आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या ९ विद्यार्थ्यांची टेक महिंद्रा या बहुराष्ट्रीय कंपनीत असोसिएट सिस्टम इंजिनियर पदावर निवड झाली असल्याची माहिती संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

टेक महिंद्रा ही अनेक देशांत व्यवसाय करणारी कंपनी आहे, जी शेकडो  जागतिक ग्राहकांना मदत करते. टेक महिंद्रा ही बेज ग्लोबल डिजिटल यांच्या यादीत समाविष्ट आहे. टेक महिंद्रा ही दळणवळण, बँकिंग आणि वित्तीय सेवा, आरोग्य सेवा, ऊर्जा, तेल आणि वायू, आयटी सोल्युशन्स,पायाभूत सुविधा आणि क्लाउड सेवाअनुभव, डिझाइन प्रक्रिया, सेवा नेटवर्क, सेवा चाचणी, सेवा व्यवसाय उत्कृष्टता प्रदान करते.

आर.सी.पटेल.अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे नुकतेच महाविद्यालयाच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्युनिकेशन शाखेचे विद्यार्थी ज्यांना  पदवी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षी ६० टक्के गुण आहेत असे विद्यार्थी या कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र होते.

तीन स्तरावर झालेल्या निवड प्रक्रियेत सुरवातीला बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक मुलाखत व शेवटी वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. त्यात अंतिम वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेतील हर्षा मनोहर भामरे, सिद्धार्थ राजेश भादुका, वैष्णवी अशोक पाटील, निकिता किशोर शंखपाल, विनय अरविंद बडगुजर, हेतल रवी हसवानी, विनय दिनेश अग्रवाल इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्युनिकेश अभियांत्रिकी शाखेतील यश भगवान ठाकूर व हिमांशू भगवान गोराणे  या एकूण ९ विद्यार्थ्यांची वार्षिक ३.२५ लाख रुपये वेतश्रेनीवर असोसिएट सिस्टम इंजिनियर या पदावर निवड झाली.
मुलाखत प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, प्रा. अनुपकुमार जयस्वाल, प्रा.मयूर पाटील यांनी परिश्रम घेतले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने