नंदुरबार - दि.05/01/2023
रोजी श्री. राहूल
साहेबराव पाटील,
रा. तलवाडे बुद्रुक,
ता.जि.नंदुरबार यांचे
वैंदाणे शेतशिवार
गट नं.282/2
मधील पत्राटी
घरात साठवून ठेवलेला
एकूण-42,000/- रुपये
किंमतीचा 6
क्वींटल कापूस अज्ञात
चोरट्यांनी चोरून
नेल्याप्रकरणी त्यांनी
नंदुरबार तालुका
पोलीस ठाणे येथे
दिलेल्या फिर्यादच्या
अनुषंगाने नंदुरबार
तालुका पोलीस ठाणे
येथे गुरनं.04/2023
भादंवि कलम 380
प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुध्द
गुन्हा नोंद करण्यात
आला होता.
नंदुरबार
जिल्ह्याचे पोलीस
अधीक्षक श्री.पी.आर.पाटील
यांनी गुन्हे बैठकीत
कापूस चोरीच्या गुन्ह्यांचा
आढावा घेतला. पोलीसांसमोर
चोरट्यांना जेरबंद
करुन घडलेले गुन्हे
उघडकिस आणणेे हे
मोठे आव्हान होते.
त्या अनुषंगाने
कापूस चोरीच्या
गुन्ह्यांचा गांभीर्याने
तपास करुन गुन्हेगारांवर
कारवाई करणेबाबत
नंदुरबार जिल्ह्याचे
पोलीस अधीक्षक
श्री.पी.आर.पाटील यांनी
निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
वरिष्ठांच्या सुचना
व मार्गदर्शनानुसार
स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक
श्री. किरणकुमार
खेडकर यांनी कापूस
चोरीच्या पध्द्तीचा
अभ्यास करुन इत्यंभूत
माहिती घेवून आपले
बातमीदारांमार्फत माहिती
काढून कापूस चोरांचा
शोध घेत होते.
दिनांक 10/01/2023
रोजी नंदुरबार
जिल्ह्याचे पोलीस
अधीक्षक श्री.पी.आर.पाटील
यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तलवाडे गावात राहणारा दिलीप भिल व त्याचे इतर साथीदारांनी मिळून वैंदाणे गावाचे शेतशिवारातून कापूस चोरीचा गुन्हा केला आहे.
सदरची माहिती त्यांनी
स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक
श्री. किरणकुमार
खेडकर यांना सांगितली.
स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक
श्री. किरणकुमार
खेडकर यांनी तात्काळ
स्थानिक गुन्हे शाखेचे
पथकतयार करुन त्यांना
मिळालेल्या बातमीमधील
संशयीतांस ताब्यात
घेवून माहिती घेणे
सुचना दिल्या.
स्थानिक
गुन्हे शाखेच्या
पथकाने तात्काळ
नंदुरबार तालुका
पोलीस ठाणे हद्दीतील
तलवाडे गावात जावून संशयीत दिलीप भिल याची माहिती काढली असता तो तलवाडे गावात मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता दिलीप किशोर भिल, वय-20 वर्षे, रा. तलवाडे, ता.जि.नंदुरबार मूळ राहणार-पिक्चर टाकीजवळील भिलाटी साक्री, ता.साक्री, जि.धुळे असे सांगितले. त्यास कापूस चोरीबाबत विचारपूस केली असता सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देवू लागला, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीतास अत्यंत कौशल्यपुर्वक विचारपुस करुन त्याच्या विसंगत बाबी निदर्शनास आणून दिल्या व त्यास बोलते केले. त्याने सदर कापूस चोरीचा गुन्हा हा त्याचे इतर साथीदार 1) ऋतीक ठाकरे, रा. तलवाडे, ता.जि.नंदुरबार, 2) सुरेश माळीच, रा. कोकल, ता.साक्री 3) जगदीश माळचे 4) प्रमोद शिवदे अ.क्र. 3 ते 4 सर्व रा. कावठी, ता.साक्री व त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने केल्याचा सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर तलवाडे गावातच राहणार संशयीत आरोपी ऋतीक ठाकरे याचा पथकाने शोध घेतला असता तो देखील तलवाडे गावात मिळून आला. त्यास पथकातील अंमलदारांनी त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव ऋतीक रमेश ठाकरे, वय-18 वर्षे, रा. तलवाडे, ता.जि.नंदुरबार असे सांगून त्याने सुध्दा संशयीत आरोपी दिलीप भिल याने सांगितल्याप्रमाणेच हकीगत सांगितली.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील काही अंमलदार हे मिळालेल्या माहितीनुसार उर्वरीत संशयीत आरोपीतांचा शोध घेण्यासाठी तात्काळ साक्री तालुक्यातील कोकल व कावठी गावी रवाना
झाले. तेथे जावून तपास पथकाने वरील संशयीत आरोपीतांचा शोध घेतला असता वर नमूद संशयीत आरोपींपैकी सुरेश माळीच, रा. कोकल, ता.साक्री, जगदीश माळचे, प्रमोद शिवदे व अल्पवयीन हे मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता 1) सुरेश रामलाल माळीच, वय-25 वर्षे, रा. कोकल, ता.साक्री, जि.धुळे 2) जगदीश राजू माळचे, वय-20 वर्षे, 3) प्रमोद सुकदेव शिवदे, वय-25 वर्षे, अ.क्र.02 व 03 रा. कावठी, ता.साक्री, जि.धुळे असे सांगितले. तपास पथकाने त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक विचारपुस केली व त्यांना बोलते केले. सदर संशयीतांनी गुन्हा करतांना वापरलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH-15-GV-3693 हिचा वापर केलेला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांनी ऍ़पे रिक्षा क्रमांक MH-39-D-373 हिचा सुध्दा वापर करून नंदुरबार व साक्री तालुक्यातील वेगवेगळ्या शेतातून कापूस चोरी केल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने एकूण-6,00,000/- रुपये किंमतीची वरील महिंद्रा बोलेरो पिकअप व ऍ़पेरिक्षा अशी वाहने तपासकामी जप्त केली आहेत.
वर नमूद संशयीतांनी मिळून नंदुरबार व साक्री तालुक्यातील विविध ठिकाणावरून कापूस चोरी केलेल्या गुह्यांची माहिती खालीलप्रमाणे
1)
दि.23/12/2022 रोजी नंदुरबार तालुक्यातील तलवाडे बुद्रुक येथून एका शेतातून कापूस चोरी केली आहे. ( सदर प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुरनं.466/2022 भादंवि कलम 457,380 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. )
2)
दि.05/11/2021 रोजी साक्री तालुक्यातील कासारे मालपूर फाट्यालगत एका शेताच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. ( सदर प्रकरणी साक्री पोलीस ठाणे येथे गुरनं.353/2021 भादंवि कलम 380,461 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. )
3)
दि.30/09/2022 रोजी साक्री तालुक्यातील कावठी गाव शिवारातील एका शेतातील कांद्याच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. ( सदर प्रकरणी साक्री पोलीस ठाणे येथे गुरनं.342/2022 भादंवि कलम 379,461 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. )
4)
दि.30/09/2022 रोजी साक्री तालुक्यातील कावठी गाव शिवारातील एका शेतातील कांद्याच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. ( सदर प्रकरणी साक्री पोलीस ठाणे येथे गुरनं.345/2022 भादंवि कलम 379,461 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. )
5)
दि.30/11/2022 रोजी साक्री तालुक्यातील आष्टाणे गाव शिवारातील एका शेतातील पत्राच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. ( सदर प्रकरणी साक्री पोलीस ठाणे येथे गुरनं.415/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. )
6)
दि.27/11/2022 रोजी साक्री तालुक्यातील आष्टाणे गाव शिवारातील एका शेतातील पत्राच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. ( सदर प्रकरणी साक्री पोलीस ठाणे येथे गुरनं.417/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. )
7)
दि.30/10/2022 रोजी साक्री तालुक्यातील शेवाळी गाव शिवारातील एका शेतातील कांद्याच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. ( सदर प्रकरणी साक्री पोलीस ठाणे येथे गुरनं.340/2022 भादंवि कलम 379,461 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. )
वरील प्रमाणे ताब्यात घेण्यात आलेले एकूण-05 संशयीत आरोपीत व 02 अल्पवयीन यांचेकडून नंदुरबार तालुका पोलीस ठाणेचे 02 गुन्हे व साक्री पोलीस ठाणे, जि.धुळे चे 06 गुन्हे असे एकूण - 08 कापूस चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
ताब्यात घेण्यात आलेले संशयीत आरोपी 1) दिलीप किशोर भिल, वय-20 वर्षे, 2) ऋतीक रमेश ठाकरे, वय-18 वर्षे, 3) सुरेश रामलाल माळीच, वय-25 वर्षे, 4) जगदीश राजू माळचे, वय-20 वर्षे, 5) प्रमोद सुकदेव शिवदे, वय-25 वर्षे व 02 अल्पवयीन यांना गुन्ह्याचे तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आलेले असून सदर आरोपीतांकडून
आणखी काही गुन्हे
उघडकीस येण्याची
शक्यता नाकारता
येत नाही असे
नंदुरबार जिल्ह्याचे
पोलीस अधीक्षक
श्री.पी.आर.पाटील यांनी
सांगितले.
