शिरपूर - महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठेवणारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया सहाय्यक निबंधक शिरपूर यांना धुळे जिल्हा ग्राहक आयोगाची चपराक,तक्रारदार शेतकऱ्यास त्वरित कर्जमाफीचा लाभ देण्यासह आठ हजार रुपये नुकसान भरपाई खर्च देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
विखरण तालुका शिरपूर येथील शेतकरी श्री गुलाब तुकाराम पाटील यांनी व त्यांची पत्नी संगीता गुलाब पाटील यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया विखरण शाखेकडून दिनांक 17 फेब्रुवारी 2016 रोजी अनुक्रमे एक लाख पन्नास हजार, 70 हजार असे पीक कर्ज घेतले होते परंतु शेतीमालाला भाव नसल्यामुळे अस्मानी संकटामुळे सदरील शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करू शकले नाहीत,, महाराष्ट्रात एक चार 2015 ते 2019 पर्यंत कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची होत असलेली दुर्दशा, व वाढत्या आत्महत्या लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने ०१/४/२०१५ ते ३०/९/२०१९ पर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची महत्वकांशी योजना २७ डिसेंबर २०१९ रोजी शासनाने जाहीर केली होती . शासनाने जाहीर केलेल्या तरतुदीप्रमाणे तक्रारदार शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र असताना देखील शाखाधिकारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी यादीत नाव समाविष्ट केले नाही , परिणामी तक्रारदार शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्यामुळे तक्रारदार यांनी शाखाधिकारी, सहाय्यक निबंधक शिरपूर तक्रार निवारण अधिकारी, तहसीलदार शिरपूर यांच्याकडेच वेळोवेळी तक्रारी अर्ज दिले तरी देखील कर्जमाफी पोर्टल कडे शाखाधिकारी यांनी नाव दिले नाही, तक्रारदारांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही वेळोवेळी चकरा मारून देखील तक्रारदार यांना न्याय मिळाला नाही म्हणून तक्रारदार यांनी अॕडव्होकेट. संतोष डी पाटील, शिरपूर यांच्यामार्फत शाखाधिकारी विखरण , विभागीय व्यवस्थापक नाशिक, सहाय्यक निबंधक शिरपूर , जिल्हाधिकारी सो, धुळे यांना रीतसर नोटीसा पाठवल्या तरीदेखील तक्रारदारास न्याय मिळाला नाही उलट पक्षी तक्रारदारास कर्ज वसुलीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्या , त्यामुळे तक्रारदार यांनी धुळे येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे ॲडव्होकेट संतोष डी पाटील शिरपूर यांच्यामार्फत दिनांक १२/११/२०२१ विरोधात तक्रार दाखल केली.
सदरील कामात ग्राहक तक्रार क्रमांक १०१/२०२१,१०२/२०२१ अशा दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. ग्राहक तक्रार आयोगासमोर कामकाज चालून दोन्ही बाजूंचे पुरावा युक्तिवाद ऐकून, ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी विखरण , विभागीय व्यवस्थापक नाशिक, सहाय्यक निबंधक शिरपूर, यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे तक्रारदार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही , शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवले हा निष्कर्ष नोंदवून दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी तक्रारदारांचा अर्ज मंजूर करून सामनेवाले यांना ४५ दिवसाच्या आत महाराष्ट्र शासनाचे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक १२ १९/ प्र. क्र. १७५/२ दिनांक. २७ डिसेंबर २०१९ महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करून तक्रारदार यांना सदरील योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा व शारीरिक मानसिक नुकसानभरपाई म्हणून आठ हजार रुपये खर्च देण्याचा आदेश दिला असून सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखाधिकारी, विभागीय सेंट्रल बँक ऑफ इंडिया सहाय्यक निबंधक शिरपूर यांना आयोगाने चपराक दिली असून सदर तक्रारदार शेतकऱ्यास न्याय दिला आहे, सदरील कामकाज ग्राहक तक्रार आयोगाचे न्यायासन अधिकारी मा. संजय पी.
बोरवाल, मा. सदस्य संजय जोशी, मा. सदस्या सौ. प्रतिभा पाटील त्यांच्यासमोर चालले .
तक्रारदार यांच्या वतीने ॲडव्होकेट संतोष डी. पाटील शिरपूर, यांनी कामकाज पाहिले.
