घरगुती गॅसच्या गैरवापर, पुरवठा विभागाची कारवाई गुन्हा दाखल




शिरपूर  -शहरातील अंबिका नगरात घरगुती गॅसचा बेकायदेशिर वापर करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पिकअप वाहनासह 3 लाख 17 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत शिरपूर तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षक प्राजक्ता सोमलकर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि.12 जानेवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील आर.सी.पटेल शाळेच्या मुख्य इमारतीच्या मागील एकता नगरात अनधिकृतरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधील गॅस इलेक्ट्रीक मोटार पंपाच्या सहाय्याने महेश दशरथ मराठे (वय 30 रा. अंबिका नगर) याच्या एम. एच. 18/ बी. जी. 9603 क्रमांकाच्या पिकअप वाहनात योगेश भिका धनगर (वय 22 रा. शिरपूर) हा इले.मोटार व पंपाच्या सहाय्याने घरगुती गॅस भरताना आढळून आला.

या कारवाईत 3 लाखांचे पिकअप वाहन व 17 हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आगरकर करीत आहेत.
शिरपूर शहरात या व्यतिरिक्त देखील मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅसच्या काळाबाजार होत असून वाहनांमध्ये भरण्यासाठी घरगुती गॅसचा वापर होत आहे. बहुतांशी प्रवासी गाड्या या एलपीजी असून या गाडीमध्ये गैर मार्गाने गॅस भरणा केला जातो. त्यासाठी शहरात अजूनही इतर ठिकाणी असे गॅस फिलिंग सेंटर आहेत. त्यामुळे पुरवठा विभाग त्यांच्या शोध घेऊन  त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने