शिरपूर :-तालुक्यातील भामपूर येथे तालुकास्तरीय दोन दिवशीय विज्ञान शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात यशस्वी विद्यार्थ्यांना शिरपूर शहर पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, गटविकास अधिकारी संजय सोनवणे, किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार श्रीमती आशाताई रंधे व अनेक मान्यवर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून समारोप करण्यात आला. तालुक्यातील भामपूर येथे शिक्षण विभाग पंचायत समिती शिरपूर, तालुका मुख्याध्यापक संघ, तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ व आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय भामपूर ता. शिरपूर जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने स्तरीय विज्ञान ४३ वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात तालुक्यातील
120 विद्यार्थी व 27 शिक्षक असे एकूण 147 जणांनी सहभाग घेतला. 147 विज्ञान साहित्य व उपकरणे मांडण्यात आले.त्यात पूर्व प्राथमिक गटात 16 साहित्य, उच्च प्राथमिक गटात 49 विज्ञान साहित्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात 42, उच्च प्राथमिक आदिवासी गटात 8, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी गटात 5, प्राथमिक शिक्षक गटात 14, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गटात 8, लोकसंख्या शिक्षण प्राथमिक शिक्षक 1, लोकसंख्या शिक्षण माध्यमिक शिक्षक 1, प्रयोगशाळा परिचर प्राथमिक सहाय्यक 1, प्रयोगशाळा परिसर माध्यमिक सहाय्यक 1 असे एकूण 147 विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले होते.प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या साहित्य प्रदर्शनासाठी प्रा. राकेश चौधरी, आर. वाय. पाटील, श्रीमती व्हि. डी. बिऱ्हाडे, श्रीमती तृप्ती बडगुजर, सौ. प्रतिभा गिरासे, जी. के. सोनवणे, सचिन जडिये, प्रा. डी. एस. साळुंखे, बी. एस. राजपूत, एस. डी. गाडीलोहार, प्रा. सौ. एम. एन. पाटील, प्रा. चेतन अहिरे, नंदकिशोर बाविस्कर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी एफ. के. गायकवाड, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, पंचायत समिती सदस्य वनिताताई पाटील, जुने भामपूर सरपंच सुशिलाबाई भिल, नवे भामपूर सरपंच बाळासाहेब मोहन पाटील, जुने भामपूर उपसरपंच बाळासाहेब चंद्रकांत देवरे, उपसरपंच डॉ. दोरीक, पोलीस पाटील संभाजी पाटील, प्राचार्य पी. व्ही. पाटील, शिरपूर तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष एस. एन. बोरसे, आर. सी. पटेल माध्य. विद्यालय भामपूरचे मुख्याध्यापक व्ही. पी. दीक्षित, आर. एन. पवार (सचिव तालुका मुख्याध्यापक संघ), निलेश देसले (अध्यक्ष शिरपूर विज्ञान व गणित अध्यापक संघ), डॉ. मनोज निकम, के. डी. बच्छाव, श्रीमती डॉ. निता सोनवणे (शिक्षण विस्तार अधिकारी), आर. के. गायकवाड (शिक्षण विस्तार अधिकारी), ई. बी. आव्हाड (शिक्षण विस्तार अधिकारी), श्रीमती मनिषा वानखेडे (शिक्षण विस्तार अधिकारी), डी. पी. बुवा (शिक्षण विस्तार अधिकारी), बी. एस. बुवा (शिक्षण विस्तार अधिकारी), प्राचार्य एन. सी. पवार, एस. एन. जोशी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरपूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थी, शैक्षणिक साहित्य व शाळेचे नाव पुढीलप्रमाणे :
पूर्व प्राथमिक विद्यार्थी गट :
प्रथम गुंजन शिवशांत महाले (हायड्रोलिक लायबीरिन्थ) आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल, द्वितीय अद्वैत प्रदीप पाटील (हाऊ नासा लँडेड ऑन मास) मुकेश आर. पटेल मिलिटरी स्कूल शिरपूर, तृतीय लक्ष मांगीलाल राठोड (स्मार्ट सिटी) एस. आर. बी. इंटरनॅशनल स्कूल दहिवद, उत्तेजनार्थ गार्गी समाधान सनेर (फ्रॅक्शन पझल) आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल शिरपूर.
उच्च प्राथमिक विद्यार्थी गट :
प्रथम महेश गोपाल बाविस्कर (अलार्म सिस्टीम टू प्रिव्हेंट एक्सीडेंट) मुकेश आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल शिरपूर, द्वितीय सलोनी अनिल देवरे (हायड्रोफोनिक्स) आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय भामपूर, तृतीय मिताली चंद्रकांत भावसार (थ्रीडी होलोग्राम स्क्रीन व्हिडिओ) सौ. सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर, उत्तेजनार्थ मोहित दीपक बोरसे (इको फ्रेंडली इलेक्ट्रिक जनरेटर) डॉ. व्ही. व्ही. रंधे इंग्लिश मीडियम स्कूल शिरपूर.
उच्च प्राथमिक आदिवासी गट : प्रथम सागर सुरेश पावरा (वॉटर वॉशर पंप) प्राथमिक आश्रम शाळा सांगवी.
माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यार्थी गट : प्रथम तुषार निंबा सूर्यवंशी (पिरीओटा कार्ड्स) आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर, द्वितीय यश सिताराम माळी (कार्बन ऍबसॉर्बिंग) डॉ. पां रा. घोगरे उच्च माध्यमिक विद्यालय शिरपूर, तृतीय धनश्री सतीश पाटील (प्रदूषण नियंत्रण) पांडू बापू माळी हायस्कूल शिरपूर, उत्तेजनार्थ प्रतीक्षा रवींद्र बिऱ्हाडे (शेवाळ पासून इंधन निर्मिती) नूतन माध्यमिक विद्यालय दहिवद.
माध्यमिक उच्च माध्यमिक आदिवासी गट : प्रथम उदय मखाराम पावरा (मॉडर्न चष्मा) महादेव आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम.
प्राथमिक शिक्षक गट : श्रीमती स्नेहा सुनीलकुमार भूरसे (लाईट थेटर) मुकेश आर. पटेल मिलिटरी स्कूल तांडे.
माध्यमिक शिक्षक गट : पुष्पेन्द्र सुरेशसिंह परदेशी (हिट) आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर.
प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर गट : ज्ञानेश्वर शालिग्राम कुवर (साहित्याची ओळख) कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालय अर्थे).
लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गट : अमित कांतीलाल गुजर (लोकसंख्या रेल्वे) पांडू बापू माळी मुन्सिपल शिरपूर.
माध्यमिक गट लोकसंख्या शिक्षण अनिल अंबर पाटील (बहुउद्देशीय लोकसंख्या शिक्षण) देशभक्त फकीर आप्पा जुनिअर कॉलेज बोराडी. हे सर्व विजेते विद्यार्थी व शिक्षक यांना बक्षीस, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
.
प्रास्ताविक गणित व विज्ञान मंच अध्यक्ष निलेश देसले, सूत्रसंचालन ए. ए. चौधरी व दिनेश ठाकरे यांनी केले. आभार विज्ञान शिक्षिका श्रीमती एस. बी. पाटील यांनी मानले.
