शिरपूर प्रतिनिधी - संयुक्त राष्ट्र संघाने वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार मकर संक्रांत भोगी हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यात पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे . या संकल्पनेतून काळाच्या ओघात मागे पडलेली महत्त्वाची पिके व आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असलेली ज्वारी बाजरी नाचणी वरई राळा राजगिरा इत्यादी पिकांचे उत्पादन वाढवणे, पूरक व्यवसायातून उत्पन्न वाढ करणे आरोग्य विषयक फायदे बाबत जनजागृती करून लोकांच्या आहारात त्यांचे प्रमाण वाढविणे हे मुख्य हेतू आहेत या अंतर्गत गाव पातळी पासून देशपातळीपर्यंत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने शिरपूर तालुक्यातील सुळे गावात तालुका कृषी अधिकारी शिरपूर कार्यालय मार्फत पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये कृषी विभागामार्फत पौष्टिक तृण धान्य पिकाचे आहारातील महत्त्व त्याचे फायदे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्या सोबतच तो धान्य पिकांचे क्षेत्र उत्पादन व उत्पादकता वाढ कशाप्रकारे करता येईल यासाठीचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी, शिरपूर विशाल मोटे, कृषी पर्यवेक्षक आर. डी. मोरे, कृषी सहाय्यक बी.जी. वाघ यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास सुळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
news
