शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगांव येथे अमरधाम चे बांधकाम प्रगतीपाथावर चालु आहे. आज सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्यासह ग्रामस्थांनी बांधकाम पाहणी करून समाधान व्यक्त केले.
बोरगाव या छोट्या गावात आजता गायत अमरधाम (स्मशानभूमी) नव्हती. ग्रामस्थांना अत्यविधीसाठी बोरगांव नदी किनारी किंवा हिंगोणी येथील अमरधाम मध्ये जावे लागत होते. गावातील कर्तव्यदक्ष युवा सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या सततच्या पाठपुराव्यातुन त्यांनी गावांसाठी स्मशानभूमी मंजूर करून आणली.
जिल्हा परिषदेच्या 2515 ग्रामीण विकास योजनेतून माजी शिक्षण मंत्री श्री अमरिशभाई पटेल, आमदार श्री काशीराम पावरा, मा जि प अध्यक्ष डॉ तुषारभाऊ रंधे, जि प उपाध्यक्ष श्री देवेंद्र पाटील, प्रियदर्शिनी सूतगिरणी चेअरमन श्री भुपेशभाई पटेल, माजी नगरसेवक श्री अशोक कलाल, माजी नगराध्यक्ष श्री प्रभाकर चव्हाण यांच्या शिफारशीने व सहकार्यातुन अमरधाम मंजूर करण्यात आले आहे.
येत्या काळात अमरधाम साठी रस्ता व बैठक व्यवस्था वनावल गटातील जि. प. सदस्या सौ अभिलाषा भरत पाटील यांच्या निधीतून त्या करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली आहे.
यावेळी सरपंच तथा विकासो चेअरमन योगेंद्रसिंग सिसोदिया, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, विठ्ठल झुलाल कोळी, दगा बुधा तिरमले, बाबुराव बोरगावकर, ग्राम पंचायत सदस्य तानकु भिल, दीपक पदमसिंग राजपूत, पांडुरंग उत्तम कोळी, रोहिदास कौतिक न्हावी, बापू भिल सांगवीकर, बांधकाम ठेकेदार कोमल गिरासे, सुपरवायझर जयदीप राजपूत व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
news
