तेरा पोलिस ठाण्याच्यां हद्दीतील तक्रारदारांना पोलिस आयुक्त यांचे हस्ते वाटप, चोरी गेलेला सव्वा कोटीचा ऐवज आरोपीतांकडुन गुन्हयातील चोरलेला किंमती माल हस्तगत , नाशिक शातांराम दुनबळे




नाशिक=पोलीस मुख्यालय, नाशिक शहर येथे आयोजित मुद्देमाल वाटप कार्यक्रमा दरम्यान सन्मानपूर्वक परत करण्यात आला. यापुर्वी देखील नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील मालाविरूध्दचे गुन्हे उघडकीस आणुन त्यातील जप्त मुद्देमाल ०७ वेळा मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम घेवून त्यामध्ये  मुद्देमाल हा फिर्यादी यांना परत करण्यात आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे वेळी  एक कोटी ३६ लाख  ७हजार४३६ जप्तकरण्यात आलेला मुद्देमाल शहर पोलीस आयुक्तअंकुश शिंदेयांचे हस्तेव प्रमुख  उपस्थिती पोलिस उपआयुक्त प्रंशात बच्छाव ,किरणकुमार चव्हाण,चंद्रकांत खांडवी,पौणिॅमा चौघुले याच्ंया उपस्थितीत  या तक्रारदारांना  फिर्यादी श्री. महेश रुईकर, श्री. विजय लाहोटी, श्री. नरेंद्र पवार, श्रीमती अश्वीनी मोरे श्रीमती सुनिता तिदमे, श्री सुनिल कर्डक, श्री. योगेशभाई पोमल, श्रीमती सुनंदा कुलकर्णी, श्री. अपुर्व दराडे, श्री. विनोद चौधरी, सौ. कल्पना आहिरे, सौ. स्विटी जैन, सौ. सिमा सिंगानिया, श्री. किरण पाटील अशांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून पोलीस खात्या विषयी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली सदर कार्यक्रमास मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सौ. नाशिक, श्री प्रशांत . बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे , श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १, श्री. चंद्रकांत खांडवी, - पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - २, श्रीमती पौर्णिमा चौगुले / श्रींगी, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय तसेच सर्व सहा. पोलीस आयुक्त, तसेच सर्व पोलीस स्टेशनचे व शाखेचे प्रभारी अधिकारी व मुद्देमाल कारकुन व पोलीस अंमलदार आणि ज्या गुन्हयातील मुद्देमाल वाटप करण्यात आला आहे. त्या गुन्हयाचे फिर्यादी व नाशिक शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .

१,३६,०७,४३६ रुपये किंमतीच जप्त मुद्देमाल सबंधी पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात घडलेले मालमत्ते विषयक गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने मागील गेल्या वर्षा भरात दाखल मालमत्ते विषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरीता सर्व पोलीस ठाण्यांचे तसेच गुन्हेशाखा युनिट - १व २ व मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पोलीस अधिकारी व अंगलदार यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेवुन गुन्हे  उघडकीस आणुन त्यातील आरोपीतांकडुन गुन्हयांतील चोरलेला 
किंमती माल हस्तगत केला आहे. त्यामध्ये
१) सोन्याचांदीचे दागिने, २) मोटर सायकली, ३) मोटार वाहन, ४) मोबाईल फोन

५ ) इतर मुद्देमाल असा एकूण १,३६,०७,४३६ / रु किंमतीचा मुद्देमाल  न्यायालयाचे आदेशान्वये तसेच सी. आर. पी.सी १०२ ( ३ ) प्रमाणे आज दिनक ० ९ / ०१ / २०२३ रोजी समारंभ पूर्वक रेझिंग डे च्या दिवशी मा. श्री. अंकुश शिंदे सो., पोलीस अयुक्त नाशिक शहर यांचे हस्ते दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना देण्यात आला

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने