शिरपूर : शहरातील रथ गल्ली येथील रहिवासी श्रीमती गंगाबाई पांडू माळी (वय १०२ वर्षे) यांचे दि. १५ जानेवारी २०२३ वार रविवार रोजी सायंकाळी ५.१० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
शिरपूर येथील प्रसिद्ध व्यापारी, मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक डिगंबर पांडू माळी यांच्या त्या मातोश्री व गोपाल भटू माळी यांच्या आजी होत्या.
त्यांची अंत्ययात्रा सोमवारी दि.१६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता राहते घर, रथ गल्ली येथून निघेल.
