आर.सी पटेल अनुदानित आश्रम शाळा शिरपूर येथे सिकलसेल तपासणी शिबीर





शिरपूर -  आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे , आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र शासन यांचे द्वारा महाराष्ट्रातील आदिवासी विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहे यामधील सर्व विद्यार्थ्यांचे  सिकलसेल ॲनिमियाच्या स्थितीचे सर्वेक्षण करणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करून कार्ड वाटप करण्याबाबतची योजना संदर्भात आज आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर द्वारा आर.सी पटेल अनुदानित आश्रमशाळा शिरपूर  येथे सिकलसेल तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.  शिबिरात एकुण 555 मुला मुलींची सिकलसेल सोलुबिलीटी तपासणी केली यामध्ये 84 विद्यार्थी सिकलसेल सोलुबिलीटी पॉझिटिव्ह आढळल्या.
या शिबिरात आश्रमशाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापक सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरात सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे यांनी सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन केले.शासनाच्या या योजनेद्वारा नागपूर व नाशिक विभागाअंतर्गत सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे रोगनीदान झाल्यावर  कार्ड वाटप करण्यात येतील . शिबिर यशस्वीकरीता सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे, नितेश जाधव, समीक्षा कोर्चाम,अनामीका लामसोंगे, शुभांगी वानखेडे,पुजाकुमारी राम यांनी सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने