आमदार अमरिशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरपूर येथे १५ जानेवारी रोजी मुस्लिम तेली समाजाचा 37 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

 



शिरपूर : आमदार अमरिशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरपूर येथे १५ जानेवारी रोजी मुस्लिम तेली समाजाचा 37 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.


 शिरपूर येथे १५ जानेवारी रविवार रोजी 37 जोडप्यांचा संध्याकाळी ६ वाजता संपन्न झाला. 37 जोडप्यात चोपडा, अमळनेर, नंदुरबार, जळगांव, औरंगाबाद, होळनांथे, शिंदखेड़ा, शहादा, मलकापूर नरडाणा, अकोला, पळासनेर, मालेगांव, चंद्रपूर, मध्य प्रदेशातील, सेंधवा, पलसूद, खरगोन, पानसेमल, खंडवा, धनोरा, इन्दौर, उज्जैन, धार, बुरहानपुर बलवाडी इ. ठिकाण चे वर वधू होते. विशेष म्हणजे शिरपूर चे १२ वधू व ९ वर होते. या सोहळ्यात सुमारे ८ ते १० हजार  तेली समाजाचे लोक उपस्थित होते. महाराष्ट्र सह मध्ये प्रदेश, गुजरात, तेलंगाना, छत्तिसगड, राजस्थान आणि दिल्ली हुन समाज बांधव आले होते.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी यावेळी आपल्या मनोगतातून सामुदायिक विवाह सोहळ्याला शुभेच्छा देऊन सामुदायिक विवाह सोहळ्यांची सध्या गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात तेली समाजाचे अनेक प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

या सोहळ्यला आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, राजेंद्र अग्रवाल, के. डी. पाटील, अरुण धोबी, संजय आसापूरे, रज्जाक कुरेशी, राजू शेख, सलीम खाटीक, इरफान मिर्झा, नूर काझी, अल्ताफ मुजावर, जाकीर शेख, शकील कान्ट्रेक्टर, खतीब शेख, फिरोज काजी, डॉ. शकील, कादर बागवान, नासिर बागवान, जाकीर बागवान इ. मान्यवर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने