बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी खुनी हल्ला आरोपी अटकेत प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:एका ज्येष्ठ व्यक्तीने परिसरातील एका महिलेला फिरायला जाऊ असे सांगत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे तो तिला घेऊन गेला आणि तिथे घेऊन गेल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा देखील नोंदवला मात्र ही तक्रार मागे घेण्यासाठी या आजोबाने चक्क तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रमजान खलील पटेल ( वय 60 ) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात 38 वर्षीय महिलेने तक्रार दिलेली आहे. तक्रारदार महिला आणि रमजान पटेल हे एकमेकांच्या परिचयाचे असून 2018 मध्ये त्याने आपण फिरायला जाऊ असे म्हणत तिला आपल्या सोबत घेतले होते आणि त्यानंतर ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एका लॉजवर त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि हा प्रकार कोणाला सांगू नकोस अशी धमकी देखील दिली.


सोलापूर येथेच या महिलेने पांगरी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली त्यानंतर त्याच्या विरोधात कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि सोलापूर न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रमजान हा महिलेच्या घरी आला आणि त्याने तिला बलात्काराचा गुन्हा मागे घे यासाठी सोसायटीच्या आवारात गाठले आणि तिच्यावर चक्क पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परिसरातील रहिवाशांनी आरोपीच्या ताब्यातून तिची सुटका केली आणि त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने