शिरपूर प्रतिनिधी - दिनांक -०३/१०/२०२२. रोजी तरडी गावाजवळ धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन ,यांचा सत्काराचा कार्यक्रम शिरपुर येथे ठेवण्यात आलेला होता .जामनेरकडुन. शिरपुरकडे यांचं रस्त्याने येत असल्याने.भा.क.पक्ष,म रा किसान सभा,लालबावटा शेतमजुर युनियनतर्फै तरडीगावजवळ अपघाती रस्त्याजवळ उचं पुल मंजुर करावा व इतर मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन अँड हिरालाल परदेशी,अँड संतोष पाटील,काॅ.वसत पाटील,डाॅ,कीशोर सुर्यवंशी,काॅ.साहेबराव पाटील,तुळशीराम पाटील,रामसिंग परदेशी,प्रमोद पाटील,अरविंद पाटील,भुषण पाटील,शांतीलाल परदेशी,रामेश्वर पाटील,अनिल पाटील,अँड सचिन थोरात,हरचंद पावरा,योगेश पावरा ,शिलेदार पावरा,गुमान पावरा बापु खैरनार,भरत सोनार,कावा पावरा,तोहाण्यापावरा,सतीलाल पावरा,गुलाब पावरा,कैलास पाटील,कवरलाल कोळी,कमलाकर पाटील,कांतीलाल पाटील,तरडी, शेकडो कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला होता.
आंदोलन सुरु असतांनाच पालक मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन आदोंलनास्थळी येऊन आदोंलनकर्तायांशी संवाद साधला मागण्यांची गांभीर्य लक्षात घेऊन याठिकाणी मीच अपघातातुन बचावलो आहे.हि जागा अपघातग्रस्त आहे.येथे कोणत्याहि परीस्थीत उंच पुल करणे गरजेचे आहे.त्या साठी त्यांनी बांधकाम विभागाशी संर्पक साधला होता.डीसेंबर महिन्या अखेर काम सुरु करण्याचे आश्वासन दिलं होते.व भा.क.पक्षाने सतत पाठपुरावा करुन २७ लाखांचे मोरी पुलाचे कामास सुरुवात झालेली आहे.
म्हणुन हे आंदोलनाचे यश आहे अशी माहिती किसान सभेच्या एडवोकेट हिरालाल परदेशी यांनी दिली आहे.
शिरपुर तालुक्यात किसान सभेच्या नेत्वुताखाली,२६ ते२८ फेब्रुवारीला सांगवी ते शिरपुर ८० की.मी.अंतर पायी मोर्चा काढुन सन २०१९ शासनाचा जी.आर लाल फीतीतुन बाहेर काढुन.तालुक्यातील १२हजार वनजमिनदारक शेतकरी बांधवांना जे फार्म पर्यायी ७/१२ वनविभाकडुन वाटप करण्यात आलेला आहे.परंतु त्यांचे श्रेय घेण्याचा खटाटोप आमदारसाहेबांनी घेण्याचा प्रत्नय केला होता तसा प्रत्नय ह्या कामाचे ते घेण्यासाठी करू नयेघेऊ नये असे देखील त्यांनी म्हटले आहे.
आमदार महोदय आपण मंत्री महोदयांचा सत्कार करीत होता .ज्या रस्त्यावर सुळे गावाचा आदिवासी बांधवांचा अपघात जीव गमवावा लागला शेकडो लोक अपघातात जखमी झाले .अशा अपघातीस्थळी पालक मंत्री यांचा रस्ता अडवुन सनदशीर मार्गाने आंदोलन करुन २७ लाखांचे काम सुरु झालेलेआहे.हे आंदोलनाचे यशआहे.
तसेच अनेक प्रवासी या अपघात स्थळापासुन होणारे अपघातामुळे वाचणार आहेत.
आपल्या तालुक्यात कोट्यावधी रुपायांचे रस्त्यांची कामे आमदार महोदयांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेली आहेत.परंतु सदरील कामात मोठ्या प्रमाणात निष्कुष्ठ दर्जाचे कामे होत आहेत.याकामांकडे.जि.प.सदस्य,प.स.सदस्य,सरपंच,व आमदारा साहेबांनी लक्ष घालावे.अन्यथा ह्या भ्रच्टाचारात सर्व लोकप्रतिनीधी सहभागी आहात .असेच गृहित धरावे लागेल. असा उपरोधात्मक टोला देखील त्यांनी यानिमित्ताने लगावला आहे.
