एच. आर. पटेल महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन पाटील यांची अध्यापक गटातून उमवि अधिसभेवर निवड



शिरपूर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव च्या महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट नुसार विविध प्राधिकरणाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात महाविद्यालयीन अध्यापक गटातून शिरपूर येथील श्रीमती एच. आर. पटेल महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. गजानन पाटील यांनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय प्राप्त केला.

विद्यापीठ प्राधिकरणाच्या अधिसभेच्या निवडणूकीत संस्थाचालक, प्राचार्य आणि अध्यापक गटातून पाच वर्षासाठी उमेदवार निवडून दिले जातात. या उमेदवारांचा विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि विद्यार्थ्यनाच्या सर्वागीण विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या महत्वपूर्ण  निर्णय प्रक्रियेत सहभाग आवश्यक मानला जातो.

डॉ. गजानन पाटील यांच्या स्तुत्य निवडीबाबत शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, उद्योगपती चिंतनभाई पटेल, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शितोळे, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने