दोडाईचा खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जिवन भोई यांची बिनविरोध निवड दोडाईचा(अख्तर शाह)












दोडाईचा खान्देश  मराठी पत्रकार संघाचा 
अध्यक्ष पदी  जीवन  भोई 
यांची  बिनविरोध     निवड                              खान्देश मराठी पत्रकार संघाच्या १३ व्या वर्षी झालेली  नुक्तीच स्तुत्य  निवड दिनांक २३ जानेवारी २०२३ सोमवार रोजी सायंकाळी ६.०० वा. दोंडाईचा  येथे  शासकीय रेस्ट हाऊस येथे खानदेश मराठी पत्रकार संघाच्या १३व्या वर्षी नूतन अध्यक्ष निवडीबाबत बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीत सर्वानुमते दैनिक पोलीस शोध पत्रकार जीवन लक्ष्मण भोई यांची सर्वानुमते पुढील एका वर्षासाठी निवड करण्यात आली. यावेळी बैठकीत माजी अध्यक्ष राजन मोरे, दौलत सूर्यवंशी, सदाशिव भलकार, मनोहर देवरे, दिनेश ठाकरे, अनिल सिसोदिया, कैलास राजपूत, सुनील धनगर, अमृत पाटील, नरेंद्र राजपूत, हेमंत मराठे, समाधान ठाकरे, विजय बागल, महेंद्र कोळी, आदी उपस्थित होते. यावेळी जंगी पण अध्यक्षपदाच्या  रस्सीखेच मध्ये जीवन भोई यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली सर्व  सदस्यांनी दिली. तसेच मागील कार्यकाळात जे काही लोकाभिमुख कामे किंवा जनतेच्या समस्या यांना वाचा फोडून न्याय दिला गेला असेल किंवा राहून गेले असतील असे काही विषयांना पुढील  काळात खानदेश मराठी पत्रकार संघाकडून टप्प्याटप्प्याने न्याय कसा देता येईल यावर सर्व सदस्यांनी चर्चा करून नियोजन केले. यावेळी खानदेश मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी हेमंत  मराठे, सचिवपदी समाधान ठाकरे व प्रदीप जाधव, कार्याध्यक्षपदी महेंद्र  कोळी, सल्लागार समिती म्हणून कैलास राजपूत, अनिल सिसोदिया, दौलत सूर्यवंशी, सुनील धनगर,दिनेश ठाकरे, मनोहर देवरे, प्रदीप जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी मागील अध्यक्ष राजन मोरे यांचे गुलाब पुष्प देऊन पदमुक्त करण्यात आले. त्यानंतर 
दौलत सूर्यवंशी 
आभार व्यक्त केले बैठक संपन्न करण्यात आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने