धुळे - दरवर्षी २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिन देशभर साजरा करण्यात येतो. समारंभाचे विविध शासकीय/ निमशासकीय तसेच खाजगी संस्थामार्फत ध्वजारोहण करण्यात येतात. यावेळी स्थानिक पातळीवर जनतेमार्फत राष्ट्रीय ध्वजाविषयी असलेले प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शविण्याकरीता वैयक्तीकरित्या छोटया राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. या संदर्भात शासनामार्फत वेळोवेळी सुचना दिल्या आहेत. तसेच जाणीवपूर्वक जर राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा १९७१ चे कलम ०२ अनुसार कारवाई करण्यात येते. काही वेळा राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विविध कला, क्रीडा प्रसंगी वैयक्तीक रित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर ईतरत्र टाकण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे. जेणेकरून नंतर हे छोटे छोटे राष्ट्रध्वज रस्त्याचे कडेला किंवा इतरत्र ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात. हे दृश्य राष्ट्रीय प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाचे वापरानंतर एकतर त्याचा योग्य तो मान राहील याप्रमाणे ते ठेवण्यात यावे. अथवा अशासकीय संस्था, तसेच इतर संघटनाना सुपुर्द करावे. सदर अशासकीय संस्था व संघटनानी त्यांना शासनाने दिलेल्या अधिकारानुसार सदरचे राष्ट्रध्वज मा. जिल्हाधिकारी व तहसिलदार यांचे कडे सुपुर्द करावे..
तसेच रस्त्यात पडलेले ईतरत्र विखुरलेले राष्ट्रध्वज दिसणे ही बाब राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असुन केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरीता प्लॅस्टीकच्या वापरास मान्यता नाही. प्लास्टिकचे ध्वजाचा वापर पुर्णपणे बंद करुन जनतेच्या वैयक्तीक वापरासाठी छोटया कागदी ध्वजाचा वापर करण्यात यावा. तथापि अशा कागदी ध्वजाचा वापर करतांना त्याचा योग्य तो मान राखणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यांची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन धुळे पोलीस दलाचे वतीने श्री. संजय बारकुंड पोलीस अधिक्षक, धुळे यांनी केले आहे.
