नानासाहेब भिमसिंग भिका राजपूत यांचा संघटनात्मक कार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मान

 

तळोदा - अखिल भारतीय क्षत्रिय महासभा ह्या संघटने तर्फे जळगाव येथील मेळाव्यात प्रदेश संघटक मंत्री व विभागीय प्रचारक सचिव श्री नानासाहेब भिमसिंग भिका राजपूत यांनी गेले 5 ते 6 महिन्यात 300 हून अधिक सभासद नंदुरबार, नवापूर, शहादा ,अक्कलकुवा ,तळोदा ,शनिमांडळ, अनरद,नाशिक विभागात, नाशिक शहर प्रत्येक ठीकाणी जावून संघटनेची कामकाजाची दीशा पटवून देत संघटनात्मक कार्य केल्याबद्दल त्यांना समाज सेवा कार्य सन्मानचिन्ह राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डाॅ.कुवंर  हरिबनसिहजी ( मा. खासदार) ,प्रदेश अध्यक्ष माननीय राजेंद्रसिंहजी राजपूत यांच्या हस्ते मिळाले .ह्या प्रसंगी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब अजयसिंग राजपूत, ऊपाध्यक्ष भाऊसाहेब उपेंद्र राजपूत, कार्याध्यक्ष बापूसाहेब केवलसिंग राजपूत, युवा कार्याध्यक्ष भाऊसाहेब महेंद्रसिंग गिरासे ,राष्ट्रीय पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी  जिल्हा पदाधिकारी अन्य मान्यवर उपस्थित होते. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने