धुळे येथील महाराणा प्रताप माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा 28 वा वार्षिक पारितोषिक समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष मा.नानासाहेब श्री नरेंद्र सिंह सिसोदिया हे होते .प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री मोहनजी देसले साहेब (शिक्षणाधिकारी माध्यमिक जि प धुळे )तसेच शाळेचा माजी विद्यार्थी श्री.रवी साहेबराव खेडकर हे होते. सदर प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय एम एन राजपूत, शालेय समितीचे चेअरमन माननीय श्री नानासाहेब विजयसिंह सूर्यवंशी, व्हॉ. चेअरमन माननीय प्रकाश सिंह जाधव, श्री उत्तम सिंह राजपूत ,श्री महेंद्रजी परमार , डॉक्टर दरबारसिंग गिरासे ,सौ नीताताई सिसोदिया, श्री. केवल सिंग राजपूत आदी संचालक मान्यवर उपस्थित होते. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मा. श्री कोमलसिंग राजपूत मा. श्री संजय माळी सर , श्रीमती सुनिताताई वळवी , श्री कोटेच्या यांचीही विशेष उपस्थिती होती.
आदरणीय देसले साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आवाहन केले की, "मुख्याध्यापकांनी सांगितलेले एखादे काम म्हणजे विशेष संधी मानून सर्व शिक्षकांनी कर्तव्य तत्पर बनले पाहिजे. सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना नावासह ओळखले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांना नावासह ओळखले पाहिजे. " कोणत्याही वटवृक्षाखाली लहान झाडे झुडपे यांची वाढ होत नाही परंतु शेजारी असलेल्या मोठ्या संस्थेच्या बरोबरीने येण्यासाठी केलेल्या विविध उपक्रमांचे आदरणीय देसले साहेबांनी कौतुक केले त्याबद्दल गौरवोदगार काढले.
श्री रवी खेडकर यांनी मनोगतात सांगितले की, स्वतःला आकार देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. शाळेने केलेल्या संस्कार आणि मिळालेले ज्ञान याच्या पायावर आपण आपले जीवन भक्कमपणे यशस्वी केले पाहिजे असे म्हटले. अध्यक्षीय समारोप करताना आदरणीय नाना साहेबांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले आणि यापेक्षा अधिक यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन त्यांनी सदर प्रसंगी केले.
माननीय श्री मोहनजी देसले साहेब यांच्या शुभहस्ते ८० पारितोषिकांचे वितरण करण्यात आले सदर प्रसंगी श्री रवी खेडकर यांचे शुभहस्ते अमृतोत्सव या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
श्री हितेंद्र परमार यांनी ईशस्तवन आणि स्वागत गीत पेटी वादनासह विद्यार्थ्यांचा समवेत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नरेंद्र पाटील यांनी केले . अहवाल वाचन प्रधानाचार्य सुचिताताई भंडारी यांनी केले . हस्तलिखित विषयी सविस्तर विवरण डॉ. श्री किशोर आरगडे यांनी केले बक्षिसाच्या यादी वाचनाचे काम श्री रवींद्र सिंग राजपूत यांनी केले आणि श्री जी.व्ही.पावरा यांनी आभार मानले. पसायदान श्रीमती सुजाता शंखपाळ यांनी म्हटले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
