शिरपूर : नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या नवीन वर्षातील दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धुळे नंदुरबार विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते तसेच माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 डिसेंबर 2022 रोजी शिरपूर येथे जनक विला निवासस्थानी करण्यात आले.
यावेळी नागपूर नागरिक सहकारी बँक शिरपूर शाखेचे व्यवस्थापक प्रवीण पंडित, एस. व्ही. के. एम. हॉस्पिटल प्रकल्प संचालक जी. बी. गुजर, इंजिनिअर राजेंद्र देवरे, इंजिनिअर ईश्वर पाटील उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी यावेळी नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या कामाबद्दल कौतुक करून बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
नागपूर नागरिक सहकारी बँक शिरपूर शाखेचे व्यवस्थापक प्रवीण पंडित
यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि दिनदर्शिकेची प्रत देऊन आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा सत्कार केला.
नागपूर नागरिक सहकारी बँक शिरपूर शाखेबद्दल व्यवस्थापक प्रवीण पंडित यांनी माहिती दिली.
यावेळी नागपूर बँकेचे सिनिअर क्लर्क देवेंद्र गिरासे, प्रवीण चौधरी, श्रीमती तनुजा राजपूत, रवींद्र पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
