सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार नारायण भिलाने यांना जाहीर

 



ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित दोंडाईचा ता शिंदखेडा जि धुळे नूतन माध्यमिक विद्यालय येथील उपशिक्षक नारायण भिलाने यांना राज्य शासनाचा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक म्हणून श्री भिलाने एकमेव पुरस्कार प्राप्त आहेत. नुकताच शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी सत्कार केला आहे. 3 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्री भिलाने यांनी कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत ऑनलाइन शिक्षणाचा सुयोग्य वापर करून झूम मीटिंग, गुगलमीट ,व्हाट्सअप ,युट्युब याद्वारे अध्ययन अध्यापनाचे काम अविरतपणे सुरू ठेवले. यूट्यूबच्या माध्यमाने 760 व्हिडिओंची इयत्ता नववी व दहावी गणित व शालेय स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाची तयारी करून 1,65,000 विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्याशी संपर्क साधण्यात यशस्वी ठरले.

ऑल इंडिया रामानुजन मॅथ्स क्लबचे नॅशनल रिसोर्स पर्सन व राष्ट्रीय स्पर्धेत कु. देवयानी बन्सीलाल धोबी ही विद्यार्थिनीने संपूर्ण भारतातून दुसऱ्या क्रमांकाने बहुमान मिळविला.  वृक्षारोपण, कोरोना योद्धा, रक्तदानव आपला हात जगन्नाथ यासारख्या शैक्षणिक व सामाजिक  कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर  झाल्याने ज्ञानोपासक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. हेमंतरावजी देशमुख, चेअरमन डॉ. रवींद्र देशमुख, संचालक अमितदादा पाटील, सचिव जुई देशमुख पाटील, अनिताताई देशमुख,माजी आमदार बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे, डायटच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर ,गटशिक्षणाधिकारी डॉ. सी के पाटील,गणेश चव्हाण, प्राचार्य ए डी पाटील, मुख्याध्यापिका पी.पी. महिरे- वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी डी एस सोनवणे यांच्यासहित सर्वच शिक्षक, पालक , मित्र,विद्यार्थी, व नातेवाईक यांच्यातर्फे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने