माहेश्वरी महिला मंडळ तर्फे मकर संक्रांती निमित्त गोशाळेतील ३० गोमातांना छप्पन भोग अर्पण

 



शिरपूर : येथील माहेश्वरी महिला मंडळ तर्फे मकर संक्रांतीच्या निमित्ताने माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, सौ. शोभाताई राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात येऊन गोशाळेतील ३० गोमातांना छप्पन भोग अर्पण करण्यात आले.

त्यामध्ये सर्व पालेभाज्या, फळे, गुळ, तूप, गव्हाची लापशी, विविध प्रकारचा चारा यांचा समावेश होता. गोशाळेमध्ये अशा प्रकारचा उपक्रम मकर संक्रांतीच्या निमित्ताने पहिल्यांदाच बघून सर्व परिसर उत्साही झाला. यावेळी इस्कॉन परिवाराच्या तर्फे भजनाचा कार्यक्रम तसेच संकल्प सोडत महिला भगिनींनी गाईंना छप्पन भोग अर्पण केले.
या कार्यक्रमात माहेश्वरी समाजातील सुमारे ३० महिला सदस्या याप्रसंगी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, सौ. शोभाताई राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.शारदा भंडारी, सचिव सौ.दिपाली भक्कड, कोषाध्यक्षा सौ.प्रियंका भंडारी, सदस्या सौ.शुभांगी राठी, सौ.अलका भंडारी यांनी प्रयत्न केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने