शिरपूर - शिरपूर तालुक्याचे लोकप्रिय विकासरत्न भुतपूर्व नगराध्यक्ष प्रियदर्शनी सुतगिरणीचे चेअरमन मा.भुपेशभाई पटेल यांनी असली गावाला भेट देऊन सुरु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी निरीक्षण करून वेगाने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुचना दिल्या आहेत.
तालुक्यातील असली गावी शासनाच्या विविध योजनातून विकास कामे सुरू आहेत. सदरच्या विकास कामात कोणतीही अडचण येऊ नये व विकास कामे ही उत्कृष्ट गुणवत्तेची व्हावी यासाठी सदर कामांना भेट देऊन निरीक्षण व मार्गदर्शन यांनी दिले आहे. शिवाय याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ संपर्क करून अडचण दूर करण्याबाबत देखील गावकऱ्यांना आश्वासन दिले आहे.
यावेळी सरपंच सरलाताई पांडूरंग धनगर उपसरपंच हिराताई कोळी सदस्य श्री पांडूरंग धनगर आदर्श शिक्षक श्री लोटनभाऊ कोळी सर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य श्री.राहुल ईशी,श्री.महेंद्र वंजारी,श्री.चतुर वंजारी,श्री.छोटू धनगर,श्री.हिरालाल वंजारी,श्री.मधुकर मंगळे,श्री,सुनील मोरे, ग्रा.प सदस्य,श्री.किरण कोळी,दुर्योधन कोळी,सुरेश मोरे,अमोल कोळी,भगवान कोळी ई उपस्थित होते.
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून भाई साहेबांनी असली गावाला भेट देऊन कामांची पाहणी केली व मार्गदर्शन केले म्हणून गावकऱ्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे.
