शिरपूर: येथील पांडू बापू माळी म्युनिसिपल विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षक बी.ए. मोरे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एस. कानडे, पर्यवेक्षक एम. एम. बैसाणे, एस. आर. गवळी, ज्येष्ठ शिक्षक एस. एस. पावरा, ए. एच. कोळी, श्रीमती एस. जी. वाडीले, श्रीमती जे .एन. महाजन आदी उपस्थित होते. यावेळी स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कु.युतीषा पवार, धनश्री मराठे, मोहित पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात बी. ए .मोरे म्हणाले की, युवकांनी सदैव तत्पर राहून स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वतःसाठी व देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत रहावे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.एन. गिरासे तर आभार पी.बी. वारुळे यांनी मानले.
