शिरपूर -
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयाची इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी मनस्वी अनिल जाधव ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत धुळे जिल्ह्यातून ग्रामीण सर्वसाधारण ५६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र झाली. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण मंत्री आ. अमरिशभाई पटेल संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेश भाई पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एन.गोसावी यांनी अभिनंदन केले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनीला उपशिक्षक आर एम जाधव, डी व्ही जावरे, व्ही.बी कढरे व्ही बी चौधरी , बी ओ वाघ ,ए एस गिरासे, टी यु कुरेशी,एस पी महाजन, एस एन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
