शिरपूर : आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून "एक मुठ्ठी अनाज योजना" व सागर मित्र चळवळ अंतर्गत स्वच्छ प्लास्टिक संकलन मोहीम राबवली जात आहे.
आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या मुख्य इमारती मधील शाळांमध्ये जाऊन कु. द्वेता पटेल यांनी पाहणी केली.
मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने "एक मुठ्ठी अनाज योजना" ३० सप्टेंबर २०२२ पासून स्व. तपनभाई मुकेशभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यातून धान्य गोळा करून ते गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहचविण्यात येते. तर सागर मित्र चळवळ अंतर्गत स्वच्छ प्लास्टिक संकलन केले जाते. विद्यार्थी सदर प्लास्टिक शाळेत जमा करतात. याची पाहणी शाळेत जाऊन कु. द्वेता पटेल यांनी केली. त्यांनी वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांकडून एक मुठ्ठी अनाज स्वीकारून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच द्वेता पटेल यांनी आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थी पुस्तकही भेट देत असल्याची माहिती घेतली.
यावेळी संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, डॉ. सुप्रिया पंतवैद्य, सौ. पौर्णिमा पाठक, प्राचार्य पी. व्ही.पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील, मुख्याध्यापक सी.डी. पाटील, मुख्याध्यापक मनोज पाटील उपस्थित होते.
"एक मुठ्ठी अनाज योजना" उपक्रमात शाळेत ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असतो ते त्या दिवशी गरीब व गरजू लोकांना मदत म्हणून एक मुठ्ठी धान्य शाळेत आणत असतात. शाळेत धान्य गोळा केले जाते आणि सदर धान्य हे गरजू व गरीब लोकांपर्यंत मुकेशभाई पटेल चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पोहोचविण्यात येते.
या उपक्रमातून गरजू व गरीब लोकांना धान्य मदत होते. तसेच विद्यार्थ्यांत बालवयातच देण्याची प्रवृत्ती निर्माण होत. या उदात्त हेतूतील हा सदर उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आपला वाढदिवस हा गरजू व गरिबांना मदत करून साजरा करण्याची प्रेरणा यातून विद्यार्थ्यांना मिळत असते. या योजनेत विद्यार्थीच नव्हे तर शाळेतील शिक्षकही वाढदिवसानिमित्त धान्य आणत असतात.
