शिरपूर : शिरपूर वरवाडे नगर परिषद संचलित पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र शासन मानव विकास मिशन अंतर्गत खेड्यावरील मुलींना शाळेत येण्यासाठी सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी शिरपूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी एफ. केे. गायकवाड, मुख्याध्यापक ए. एस. कानडे, पर्यवेक्षक सौ. जे. एस. सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख एस. एस. पावरा, अधिक्षक जे.बी.जाधव, निलेश ए. गुजर, सागर गिरासे, प्रा. ए.जी. तेले, सेविका हिराबाई शिरसाठ, विद्यार्थिनी उपस्थित होते.
