आर.सी पटेल माध्यमिक विद्यालय भामपूर येथे बाल आनंद मेळावा व फनी गेम संपन्न.




   शिरपूर - दिनांक 21 1 2023 रोजी सकाळी आठ वाजता बाल आनंद मेळावा उद्घाटन करण्यासाठी भामपूर गावाचे उपसरपंच बाळासाहेब पाटील व सौ वैशाली बाळासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले याप्रसंगी  गावाचे पोलीस पाटील श्री संभाजी हनुमंतराव पाटील व जिल्हा परिषद भांपुर शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र पाटील . प्राध्यापक बाविस्कर सर प्राध्यापक मोरे सर उपस्थित होते मुलांनी आनंद मिळाव्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खाऊ अल्पोपहार विक्रीसाठी आणला होता याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वि.पी .दीक्षित सर यांनी व्यवसायाचे महत्त्व सांगितले सूत्रसंचालन श्री अरुण चौधरी व दिनेश ठाकरे सर यांनी केले यानंतर फनी गेम  मध्ये संगीत खुर्ची.लिंबू चमचा .गोणपाट शर्यत स्लो सायकलिंग तीन पाय शर्यत अशा वेगवेगळ्या मनोरंजनात्मक खेड खेळले गेले विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यां नी सहकार्य केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने