विवाहितेचा विनयभंग करणार्या तरुणास अटक प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे: ‘ तू जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हापासून माझी फेवरेट होती आणि मला तू खूप आवडायची ‘ असे म्हणत एका तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन केलेले आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, मोहन गंगाधर साळवे ( वय 24 राहणार तळेगाव दाभाडे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नावातून पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलिसात त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे .फिर्यादी महिला यांचे यशवंत नगर परिसरात किराणा मालाचे दुकान असून त्यांच्या दुकानात मोहन हा अनेकदा यायचा त्यावेळी त्याने फिर्यादी महिला यांना जेव्हापासून तू कॉलेजमध्ये होती तेव्हापासून तू माझी फेवरेट होती आणि मला तू खूप आवडायची असे म्हणत त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. फिर्यादी घाबरून तिथून पळाल्या त्यानंतर आरोपीने त्यांचा पाठलाग केला आणि याबाबत जर कुणाला सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी देखील धमकी दिली मात्र पीडित महिलेने पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने