महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे माता पालक मेळावा आनंद मेळावा उत्साहात संपन्न श्री केवलसिंह राजपूत सर तळोदा

  



धुळे दिनांक धुळे दिनांक ओ सर 19/1/2023 रोजी  महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री बापूसो प्रकाश जाधव ( चेअरमन महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय) कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते प्रा.कल्पनाताई भागवत, मा. डॉ. नेवाडकर, डॉ. विजय चौरसिया, मा. डॉ.प्राजक्ता देवरे उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले स्वागत गीतानंतर डॉ.नेवाळकर यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. शारीरिक व मानसिक स्वास्थ टिकून राहण्यासाठी उत्तम झोप ,वेळेवर उठणे ,दिनचर्या कशी असावी याचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. विजय चौरसिया 
 यांनी आहार विहार महत्व स्पष्ट केले. प्रा. कल्पनाताई भागवत यांनी दूरदर्शन इंटरनेट मोबाईल यांचे दुष्परिणाम विशद केले. डॉक्टर प्राजक्ता देवरे यांनी कुटुंब प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन करताना कुटुंब संस्था मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडण्याच्या आवाहन केले.


 दुपार सत्रात शाळेत आनंद मेळावा घेण्यात आला. एकूण 18 स्टॉल विद्यार्थ्यांनी लावली होती विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पोषक अन्नपदार्थ आणले होते विद्यार्थ्यांच्या खाद्यपदार्थांचा लाभ व आस्वाद सर्व पाहुण्यांनी घेतला सर्व पालक शिक्षक व विद्यार्थ्यांनी देखील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला विद्यार्थ्यांना यातून नफा झाला सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जमादार आय.एस यांनी केले. वरील सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुजाता शंखपाल प्रास्ताविक मुख्याध्यापक सौ. एस. एस. भंडारी व आभार डॉ. श्री के.डी अरगडे यांनी मानले .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने