मध्य प्रदेशातील चोरट्याकडून चोरीच्या ०६ मोटरसायकली हस्तगत शिरपूर शहर पो.स्टे.चे शोध पथकाची कामगिरी



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात दिनांक 21 रोजी रात्री वरिष्ठांच्या आदेशान्वये ऑल आउट मिशन व नाकाबंदी लावण्यात आली होती.

 शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री.ए.एस. आगरकर यांनी शिरपूर शहर पो.स्टेथे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेसोबत करवंद नाका शिरपूर येथे नाकाबंदी लावून रस्त्याने येणारे-जाणारे वाहने चेक करीत असतांना रात्री ०१.३० वाजेचे सुमारास एक इसम त्याकडील मो.सा.सह करवंद रस्त्याकडे जाताना दिसला. त्यास चेक करण्यासाठी त्यास पोलीसांनी याचा प्रयत्न केला असता तो नाकाबंदीचे पोलीसांना पाहुन हुलकावणी देवून पळून जाण्याचे तयारीत असताना त्यास पकडून त्याचे नांवांच विचारता त्याने त्याचे नांव शक्तीनिसिंग सरदार वय २८ रा. दतीया राज्य मध्यप्रदेश -महादेव जाई ता. शिरपूर जि. धुळे असे सांगत असल्याने त्याचा संशय आला. त्याचे ताब्यात असलेल्या हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर मो.सा.क्र.एच.एच.१८/बी. बी. २७८३ लाल रंगाची हिची खात्री करता ती शिरपुर शहर पो.स्टे. गु.र.नं. १४/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हयातील चोरीस गेली असल्याची खात्री झाल्याने त्याने सदरची मो.सा. चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यास मो.सा.सह ताब्यात घेवून अटक केली. त्याचेकडे सखोल चौकशी

करता त्याने आणखी इतर ठिकाणी मो.सा. चोरी केल्याची कबुली देवुन चोरी केलेल्या मो.सा. महादेव जवाईपाडा येथे लावलेल्या असल्याबाबत सांगीतले. स्वरूपोनि. आगरकर यांनी तात्काळ शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना महादेव बाईपाडा येथे रवाना केले असता स्थांनी आरोपीतासह डोंगर दन्यांमधून वाट काढीत डोंगराळ भागात असलेल्या महादेव जवाईपाडा ता. शिरपुर जि. धुळे येथे जावून आरोपीने चोरी केलेल्या इतर मो.सा. हस्तगत केल्या असून आरोपीताकडे मिळुन आलेल्या एकुण ०६ मो.सा. पोलीस पथकाने जप्त केले आहेत. त्यांचे अंदाजित किंमत ०३ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.

वरील प्रमाणे एकूण ०६ मो.सा. वरनमुद चोरट्याकडून हस्तगत केल्याने मो.सा. चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आले आहेत. १) शिरपुर शहर पो स्टेशन गुरन.१४/२०२३ भाविक ३७९ प्रमाणे

२) शिरपुर शहर पो.स्टे. गुरनं. २५१/२०२० भादविक ३७९ प्रमाणे ३) पो.स्टे.जि. नाशिक येथील गुरनं. १०७/२०२९ भादवि कलम ३७९ प्रमाणे

वरीलप्रमाणे एकुण ३ गुन्हे उघडकीस आले असून इतर मिळून आलेल्या मो.सा. मालकांचा शोध घेवून संबंधीत मो.सा. बाबत दाखल गुन्हयांची माहिती घेत असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरनमुद आरोपीस अटक करण्यात आली आहे.
 ०६ मोटार सायकल हस्तगत करून एकूण ०३ गुन्हे उपडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.पुढील तपास पोना/मनोज पाटील करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री संजय बारकू मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.ए.एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर, शोध पथकाचे पोटनि/फिरण बान्हे, पोहेकॉ ललित पाटील, लाडुराम चौधरी, पोना/ मनोज पाटील, गोविंद कोली, विनोद, प्रविण गोसावी, सुकेश पावरा, प्रशांत पवार तसेच होमगार्ड लाना अहिरे, मिथुन पवार, चेतन भावसार व शरद पारधी अशांनी मिळून केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने