प्रजासत्ताकदिनी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे 401 वे उपोषण* *उपोषणकर्त्यालाही 5 रूपये सरकारला द्यावे लागतात ही शोकांतिकाच: सुशिलकुमार पावरा* *उपोषणाच्या निवेदनावर 5 रूपये स्टॅम्प टिकीटची सक्ती*




*तहसीलदार दापोली यांना 5 रूपयांचे निवेदन* 

 दापोली: शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी 401 वे उपोषण तहसिल कार्यालय दापोली समोर होणार आहे. उपोषणाचे निवेदन पावरा यांनी तहसीलदार दापोली वैशाली पाटील  यांना दिले आहे.दोषी,भ्रष्टाचारी,षडयंत्रकारी, बोगस अपंग प्रमाणपत्रधारक  विजय दाजी बाईत व बोगस डिग्रीधारक नंदलाल कचरू शिंदे या दोन  शिक्षण विस्तार अधिका-यांना व 31  दोषारोपित तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना  सेवेतून बडतर्फ करा,माझी 2 मुळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा 28 मागण्यांसाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा हे  आपले 401 वे उपोषण तहसिल कार्यालय दापोली समोर करणार आहेत. 
           उपोषणाच्या निवेदनावर 5 रूपयांची स्टॅम्प टिकीट लावण्यास तहसिल कार्यालयातील लिपीक यांनी पावरा यांना सांगितले.आतापर्यंत तहसिल कार्यालय दिलेल्या उपोषणाच्या कुठल्याच निवेदनावर आपण स्टॅम्प टिकीट लावलेले नाही.म्हणून सुशिलकुमार पावरा यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांची भेट घेतली.तेव्हा तहसीलदार यांनीही साधा अर्ज जरी असला तरी आता टिकीट लावावे लागते,अशी माहिती दिली.उपोषणकर्त्यालाही आता उपोषण करायला सरकारला 5 रूपये द्यावे लागतात, ही स्वातंत्र्य भारतातली फार मोठी शोकांतिकाच आहे.उपोषणावर निवेदनावर 5 रूपयांच्या स्टॅम्प टिकीटची सक्ती करू नका,अशीही मागणी पावरा यांनी केली.
             निवेदनात म्हटले आहे की, विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22,000/ रूपये घेणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे,स्वत:कुठल्याही प्रकारे अपंग नसून खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणे, षडयंत्र प्रकरणात स्वत:ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड पेपरवर जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे,जाणीवपूर्वक शिक्षकांचा पगार न काढणे इत्यादीं गंभीर  प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल मा.गटविकास अधिकारी दापोली, मा.गटविकास अधिकारी गुहागर, मा.शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 04/10/2018 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे. त्यांच्या विरोधातल्या दिनांक 04/07/2018 व दिनांक 29/10/2018 रोजीच्या दोन्ही चौकशीत चौकशी समितीने विजय दाजी बाईत यांना दोषी ठरवले आहे. विजय दाजी बाईत यांच्या विरोधातल्या 04/07/2018 रोजीच्या चौकशीच्या अनुषंगाने अरुण कदम माजी जिल्हा परिषद सदस्य, राजकीय पदाधिकारी,रामदास कदम माजी मंत्री , समाजकंटक,पालकामार्फत विजय दाजी बाईत यांनी माझ्या विरोधात मोठे षडयंत्र रचून बनावट व खोट्या गुन्ह्यात अडकवले.बनावट प्रकरण पोलिस चौकशीत व बातम्यांद्वारे उघडकीस आले आहे.
               एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या वर सुद्धा 31 प्रकारचे गंभीर दोषारोप आहे.तसेच नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. अशा बोगस व वादग्रस्त दोन्ही शिक्षण विस्तार अधिकारी व 31 दोषारोपित एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांना सेवेतून बडतर्फ करा, माझी 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा एकूण 28 मागण्यांसाठी मी दिनांक 26/01/2023  रोजी सकाळी 8.30 वाजता तहसिल कार्यालय दापोली समोर उपोषण करणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने