मुकटी जि. प.शाळेतील मुख्याध्यापक विश्वनाथ सोमवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप*




धुळे तालुक्यातील मुकटी येथील जि. प.शाळेतील मुख्याध्यापक विश्वनाथ सोमवंशी यांच्या मातोश्री.कोकिळाबाई साहेबराव सोमवंशी यांच्या द्वितीय पुण्यस्मरनार्थ व मुख्याध्यापक विश्वनाथ सोमवंशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इयत्ता पहिलीच्या ४० विद्यार्थांना योगाड्रेस , पाटी, वही,पेन,साहित्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी कृ. उ.बा. समितीचे मा.मुख्य प्रशासक रितेश पाटील,प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.मंगलाताई पारधी, उपसरपंच सौ.आशाताई पाटील, 
प. स.सदस्य राजेंद्र शर्मा, सोनार साहेब,विठ्ठल घुगे,सतीलाल कोळी,अशोक देसले, सौ.रेखाताई विसपुते,योगीराज सैंदाने ज्ञानेश्वर पाटील,राहुल बडगुजर, बंडु सेंदाणे,दत्तात्रय चौधरी,एकनाथ सर मान्यवर उपस्थित होते,यावेळी कै. कोकिळाबाई सोमवंशी यांच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांनी पूजन केले.शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक विश्वनाथ सोमवंशी यांच्या मार्गदर्शाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थांना चॉकलेट व "चला मिष्टान देऊया,दिवस गोड करूया" उपक्रमांतर्गत जलेबीचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष शिक्षिका,श्रीमती.पल्लवी मालोकार,श्रीमती.संध्या नगराळे,श्रीमती.उज्ज्वला भंडारी,श्रीमती.कल्पना पाटील,अशोक साळवे,सौ,सीमा साळवे,यांचे विशेष सहकार्य लाभले,आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.स्मिता पाटील यांनी केले.आभार उमाकांत पाटील यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने