मोटार सायकल चोरी करणारा सराईत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात 1 लाख 3 हजार रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे



नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करून घडलेले गुन्हे उघडकीस आणणे हे मोठे आव्हान होते. त्याअनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.

वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील, जेलमधुन सुटुन आलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवुन होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते.

दिनांक 06/01/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा शहरातील जुनी भाजी मंडी परिसरात एक इसम कागदपत्र नसलेले मोटर सायकल कमी किंमतीत विकत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 01 पथक करुन त्यांना योग्य ते नियोजन करुन सापळा लावण्याचे आदेश देवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ शहादा शहरातील जुनी भाजी मंडी परीसरात जावून खात्री केली असता एका टपरी जवळ एक इसम एका बिना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलसह दिसून संशयास्पद हालचाली करतांना दिसून आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याकडे जात असतांना संशयीत इसमाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास पाठलाग करुन ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीताला त्याचे नांव गांव विचारले असता अनिल नरपत वसावे वय-22 रा. सरी पो मोलगी ता.नंदुरबार असे सांगितले. त्याच्या ताब्यात असलेल्या मोटर सायकल बाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. म्हणुन त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदरची मोटार सायकल त्याने सुमारे 2 ते 3 दिवसापूर्वी शहादा शहरातील राजपाल वाईन शॉपच्या मागे एका घरासमोरुन चोरी केल्याचे सांगितले. त्याबाबत शहादा पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर मोटार सायकलबाबत शहादा पोलीस ठाणे गु.र.नं. 04/2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी अनिल नरपत वसावे याचेविरुध्द् यापूर्वी देखील मालमत्तेविरुध्दचे गुन्हे दाखल असल्याचे समजून आले. म्हणून त्यास अधीक विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने धडगांव, मोलगी परिसरातून आणखी तीन मोटार सायकल चोरलेल्या असून चोरी केलेल्या मोटार सायकली शहादा शहरातील नवीन बस स्थानकाच्या मागे काटेरी डपांमध्ये लपवून ठेवलेल्या आहेत बाबत सविस्तर माहिती दिल्याने तेथून 88 हजार रुपये किमतीच्या 03 असा मोटार सायकली ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत 1) धडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 03/2022 भा.द.वि. कलम 379 2) मोलगी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 01/2022 भा.द.वि. कलम 379 गुन्हे दाखल आहेत, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एकुण 1 लाख 03 हजार रुपये किमतीच्या 04 मोटार सायकली हस्तगत करुन 03 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस हवालदार सजन वाघ, मुकेश तावडे, पोलीस नाईक पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार अभिमन्यु गावीत, दिपक न्हावी यांच्या पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने