शिरपूर : शहरातील व ग्रामीण आणि आश्रम विभागातील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील सर्व प्राथमिक शाळांसाठी घेण्यात आलेल्या पुज्यनीय मम्मीजी क्रीडा महोत्सवात आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा वाल्मिकनगर शिरपूर या शाळेने झाकी या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, कमलकिशोर भंडारी, बालाजी संस्थानचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, वित्त अधिकारी अनुप शिंपी, गटशिक्षणाधिकारी एफ. के. गायकवाड, केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर, साधन व्यक्ती शालेय पोषण आहार मार्गदर्शक मनोहर वाघ उपस्थित होते.
या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तामिळनाडू राज्यातील संस्कृती दर्शन तेथील खेळ झाकीतून उत्तम पध्दतीने सादर केले. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विषयावर रांगोळीतही विषयाची उत्तम मांडणी केली. दोन्ही विभागात घवघवीत यश संपादन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती जगदाळे, शितल पाटील, किशोर सोनवणे, रविंद्र पवार, श्रीकांत पंडित, प्रवीण पावरा, पवन सोनवणे या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजन केले होते. या पारितोषिक बद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
