आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २८ विद्यार्थ्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर पदावर निवड

 




शिरपूर : येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील २८ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे सायबेज या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर या पदासाठी वार्षिक रु. ४.५० लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

डिजिटल उत्पादने आणि सेवा क्षेत्रात सायबेज ही जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. जगभरातील व्यवसायांसाठी आवश्यक तंत्रज्ञानाचे सर्वसमावेशक आणि उत्कृष्ट दर्जाचे डिजिटल उत्पादने निर्माण करून देणे तसेच त्यासंबंधित पुढील सेवा पुरविणे यासाठी सायबेजचा नावलौकिक आहे. सायबेज या कंपनीचा २७ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा ट्रॅक रेकॉर्ड असून तो सातत्याने उंचावत आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात सायबेजने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

सदर कंपनीतर्फे आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ऑन कँपस ड्राईव्ह चे आयोजन केले होते. पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी या कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र होते. या निवड प्रक्रियेत निवडीसाठी दोन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला अभियोग्यता आणि तांत्रिक चाचणी झाली. यानंतर वयक्तिक आणि तांत्रिक मुलाखतीच्या फेऱ्या झाल्या. यात यशस्वीरीत्या पुढे जात संगणक अभियांत्रिकीतील कुणाल चंद्रकांत महाजन, सिद्धार्थ राजेश भादुका, नेहा दिनेश पाटील, योगिनी ईश्वर पाटील, गायत्री जयवंत पाटील, श्रेया संजय शिंदे, मंगेश विजय सोनवणे, बुद्धभूषण शिवराम पाटोळे, कमलेश राधेश्याम धाकड, यज्ञेश भास्कर पाटील, वृषाली प्रकाशसिंग गिरासे, यश दिनेश महाजन, तरुण अनिलकुमार कुकरेजा, तेजस सुनील बागड, सिद्धी प्रकाश महाजन, लोकेश सुधाकर पाटील, मोहित भास्कर पवार, प्रतिक दौलत नेरे, शुभम अशोक पाटील, युक्ता शरदराव पाटील, जान्हवी सुदेश सूर्यवंशी, विशाल अशोक पाटील, युक्ता विष्णुप्रसाद पंडित, यश भरत नारायणी, तुषार जितेंद्रसिंग जमादार, जागृती कृष्णकांत झावर, निकिता परमेश्वर पाटील, यश संजय लोहार या २८ विद्यार्थ्यांची सायबेज मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर या पदासाठी वार्षिक रु. ४.५० लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली. 

महाविद्यालयाच्या प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या संवाद कौशल्य, अभियोग्यता चाचणी, प्रशिक्षण आणि चाचणी मुलाखती, करिअर प्लॅनिंग, मुलाखत तंत्र, गट चर्चा इ. उपक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांना निवडप्रक्रियेला सामोरे जातांना झाला. या उपक्रमांसाठी महाविद्यालयाचे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. मिल्केश जैन, संगणक अभियांत्रिकीचे प्रमुख विभाग डॉ. नितीन पाटील, प्रशिक्षण आणि समन्वयक प्रा. मयूर पाटील यांनी परिश्रम घेतले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल,  विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने