शिरपूर : शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक पंडित एस. पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव येथील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विद्याशाखे अंतर्गत पीएच.डी. पदवी प्रदान झाली.
‘डिझाइन अँड डेव्हलपमेन्ट ऑफ एनर्जी एफिशिएंट सोलर बनाना ड्रायर’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. या कामी त्यांना पुणे येथील अवसारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. दिलीप. आर. पानगव्हाणे व जळगाव येथील एस. एस. बी. टी. बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय पी. शेखावत यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. प्रा. पंडित एस. पाटील यांचे संशोधनपर शोधनिबंध स्कोपस इंडेक्स डब्लू ओ एस तसेच यु.जी.सी. सारख्या राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले असुन अनेक परिसंवाद व परीषदांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग देखील नोंदविलेला आहे. ह्या संशोधनात त्यांनी सोलर ड्रायर ची कार्य क्षमता कशी वाढवता येईल तसेच प्रत्यक्ष वेळी इंटरनेट ऑफ थिंग्स ने सोलर ड्रायर चे निरीक्षण कसे करता येईल यावर संशोधन केले, ह्या संशोधनाचा उपयोग कृषि उत्पादने, शेती तसेच फळ उत्पादने यासारख्या क्षेत्रात करता येणार आहे.
त्यांच्या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही.तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ.आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
