शिरपूर : आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या प्राथमिक विभागाचा "मम्मीजी क्रीडा महोत्सव" उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी तहसीलदार आबा महाजन, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, विश्वस्त बबनलाल अग्रवाल, कमलकिशोर भंडारी, गटशिक्षणाधिकारी एफ. के. गायकवाड, बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, श्रेणीक जैन, फिरोज काझी, जाकीर शेख, संस्था क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर, जितेंद्र जोशी आदी उपस्थित होते. तसेच संस्थेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवात शिरपूर शहरातील आर. सी. पटेल प्राथमिक शाळेने जनरल चॅम्पियनशिप पटकावले. शाळेने ९ क्रीडा प्रकारात ११ पदके मिळवले.
दरवर्षी मम्मीजी क्रीडा महोत्सव घेण्यात येतो. या क्रीडा महोत्सवात संस्थेतील २७ प्राथमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. क्रीडा महोत्सवाच्या अगोदर शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. शालेय स्तरावरील विजेते खेळाडू यांनी मम्मीजी क्रीडा महोत्सवात भाग घेतला. क्रीडा स्पर्धेत सुमारे ३ हजार खेळाडूंनी स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग घेतला.
क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी झाकी प्रदर्शन करण्यात आले. झाकी स्पर्धेत १३ शाळांनी सहभाग घेतला. यात देशातील विविध राज्यांचा विषय देण्यात आलेला होता. शाळांनी विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन या झाकीतून घडवले.
मम्मीजी क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीला शिक्षकांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम क्रमांक आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा रामसिंग नगर, द्वितीय क्रमांक एच. आर. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर, तृतीय क्रमांक आर. सी. पटेल इंग्लिश मिडियम स्कूल शिरपूर, उत्तेजनार्थ बक्षीस आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा हुडको-वाल्मिक नगर यांनी पटकावले.
झाकी स्पर्धेत प्रथम क्रमांक आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा वाल्मीक नगर, द्वितीय क्रमांक आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा रामसिंगनगर, तृतीय क्रमांक आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर व तृतीय क्रमांक आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल आदर्श नगर यांनी पटकावला.
क्रीडा स्पर्धेत विजेते विदयार्थी :
डोक्यावर पुस्तक ठेवून चालणे :
प्रथम मेहुल पाटील, द्वितीय आयुष सोनवणे, तृतीय अजय पावरा, मुली प्रथम दिव्या पाटील, द्वितीय निशा पावरा, तृतीय जानवी बंजारा.
पोत्याची शर्यत :
मुले प्रथम रोहन पावरा, द्वितीय श्रेयस पावरा, तृतीय राजवीर चौधरी, मुली प्रथम अश्विनी पाटील, द्वितीय अंजली सोनवणे, तृतीय जागृती पावरा.
पाठीला फुगा लावून धावणे :
मुले प्रथम पवन पावरा व विलास पावरा, द्वितीय समर्थ पाटील व दुर्गेश कोळी, तृतीय हिमांशू जाधव व प्रज्ञेश पाटील, मुली प्रथम रोशनी जाधव व किंजल राठोड.
रिंग टाकणे :
मुले प्रथम जय पावरा, द्वितीय योहान पावरा, तृतीय कार्तिक साळुंखे, मुली प्रथम अकार्षा गायकवाड, द्वितीय विद्या पावरा, तृतीय कविता पावरा.
बादलीत चेंडू टाकणे :
मुले प्रथम अविनाश पावरा, द्वितीय शहीद पावरा, तृतीय शामा पावरा, मुली प्रथम दिपाली पावरा, द्वितीय हर्षा पावरा, तृतीय रीना कोळी.
१०० मीटर धावणे :
मुले प्रथम संदीप वासकले, द्वितीय रोहित भिल, तृतीय ओंकार शर्मा, मुली प्रथम दिव्या पावरा, द्वितीय प्रियंका पावरा, तृतीय दिव्या महाजन.
५० मीटर धावणे :
प्रथम साक्षात भिल, द्वितीय भुवन मुजालदे, तृतीय कृष्णा गिरासे, मुली प्रथम प्रिया पावरा, द्वितीय नंदनी पावरा, तृतीय जागृती पावरा.
कॅरम :
मुले प्रथम नील साळुंखे, द्वितीय चेतन साळुंखे, तृतीय सार्थक बाविस्कर, मुली प्रथम गुंजन महाले, द्वितीय आराध्य जगताप, तृतीय हितेशी पाटील.
बुद्धिबळ :
मुले प्रथम अद्वैत पाटील, द्वितीय जयेश पाडवी, तृतीय रितेश चौधरी, मुली प्रथम मृणाल पाटील, द्वितीय रिया पाटील, तृतीय हितेश्री सोनगिरे.
बॅडमिंटन :
मुले प्रथम भार्गव सिसोदे, द्वितीय जतिन भामरे, तृतीय राजवीर खोसे, मुली प्रथम पिहू जैन, व्दितीय काव्या सोनवणे, तृतीय खुशी सोनवणे.
दोरी उडी :
मुले प्रथम योगराज गिरासे, द्वितीय विशाल पाटील, तृतीया विराट राजपूत, मुली प्रथम डिंपल शिंदे, द्वितीय ज्योती पावरा, तृतीय नैतिका चौधरी.
कबड्डी :
विजेते आर.सी. पटेल प्राथमिक शाळा शिरपूर, उपविजेते आर.सी. पटेल आश्रम शाळा वाघाडी.
खो खो :
मुले विजेते आर. सी. पटेल आश्रम शाळा असली, उपविजेते आर. सी. पटेल प्राथमिक शाळा शिरपूर,
मुली विजेते आर. सी. पटेल आश्रम शाळा शिरपूर, उपविजेते आर.सी. पटेल आश्रम शाळा असली.
रस्सीखेच :
मुले विजेते आर. सी. पटेल प्राथमिक शाळा शिरपूर, उपविजेते आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम शिरपूर,
मुली विजेते आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम आदर्श नगर, उपविजेते एच. आर. पटेल प्राथमिक शाळा शिरपूर.
