शिरपूर : शिरपूर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी आज झालेल्या मतमोजणीअंती आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने वर्चस्व राखले.
तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 7 डिसेंबर 2022 ही माघारीची शेवटची मुदत होती. आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी जि.प.अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांच्या प्रयत्नांनी बोराडी ग्रामपंचायत सरपंच पदासह पूर्णत: बिनविरोध झाली. उर्वरित 16 पैकी अनेक ग्रामपंचायतीच्या जागा बिनविरोध झाल्या. या ग्रामपंचायतींची सरपंचपदे व उर्वरित सदस्य पदे यांच्यासाठी 18 डिसेंबरला मतदान घेण्यात आले. तालुक्यातील 74 मतदान केंद्रांवर एकूण 74 टक्के मतदान झाले. 20 डिसेंबरला सकाळी दहापासून येथील तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. दीड तासांत सर्व निकाल जाहीर झाले. तहसीलदार आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर, सांगवीचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाठ, थाळनेरचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
ग्रामपंचायतनिहाय विजेते सरपंच व विजयी सदस्य असे,
अजंदे बु़ : सरपंच तुळसाबाई शामराव भिल, सदस्य : अरुणाबाई विनोद बैसाणे, गोपाल जामसिंग भिल, कासुबाई एका भिल, चंद्रकांत धोंडू पाटील, अहिल्याबाई भगवान वारुळे, सुमन फत्तु भिल, चित्राबाई लालचंद भील,तुळशीराम पुंडलिक मराठे ,ईश्वर भटू मराठे, ज्ञानेश्वर रमेश सोमवंशी, अलीनुबी बिस्मिल्ला मोमीन.
अजनाड : सरपंच : दरबार गंगाराम जाधव, सदस्य : साईस दिलीप पाटील, रंजना युवराज पाटील, मीराबाई राजेंद्र भिल, शांतीलाल श्रावण पवार, कविता ज्ञानेश्वर जाधव, भीमराव उखा सैदाणे, सुरेश मणिराम राठोड, दावाबाई शिवाजी पाटील, नवनाथ सोमा ठेलारी,रंजिता राजेंद्र जाधव, संगीताबाई वसंत जाधव.
अर्थे बु़ : सरपंच मनीषा मनोहर पाटील, सदस्य : गीता सुदाम भिल, प्रशांत श्रीराम पाटील, शोभा राजेंद्र पाटील, बापू रामा भील,दिनेश अधिकार पाटील, सुनंदा भालचंद्र पाटील, जोस्त्ना अमोल शिरसाट, दीपक निंबा साळुंखे, भानुदास शंकर पाटील, पल्लवी जितेंद्र धोबी, सुनीताबाई दिनेश बडगुजर.
अर्थे खुर्द : सरपंच वंदनाबाई दीपक गुजर, सदस्य :अविनाश विलास पवार,अश्विनी किस्मत भिल, सीमा किशोर कोळी, रत्नाबाई नरेश भील,प्रदीप प्रभाकर गुजर, पुनम नवलसिंग परदेशी ,ललिता सुरेश गवळे, ज्ञानेश्वर भिका गुजर, अशोक शिवाजी गुजर, मनीषा महेंद्र पाटील, मनीषा योगेश तिरमले.
हाडाखेड : सरपंच सुरेश अत्तरसिंग पावरा, सदस्य : संजय वसंत भिल, शेवंताबाई दार्या भिल, दिलीप दामू पावरा, प्रमिला लखन पावरा, मगन पारसिंग पावरा, सोनीबाई श्रीराम पावरा, नीताबाई आकाश पावरा, बळीराम गोमा पावरा,मेजलीबाई बेंगलाल पावरा, रमेश हिरामण वंजारी, भाईदास दुरला पावरा,रायबाई सायसिंग पावरा, रंजना ओमप्रकाश पावरा.
हिसाळे : सरपंच उत्तम मला पावरा, सदस्य : राजू जगराम भील, प्रमिलाबाई बापू भील, स्वाती विकास पाटील,भास्कर ताहू गायकवाड, भिकुबाई भिवसन कोळी, छाया नरेंद्र पाटील, मोनिका अनिल पावरा, गुलाब फत्तू पावरा, गोरख अनाजी पावरा, कविता पवन पावरा, सुमन संतोष जाधव.
करवंद : सरपंच हिरामण हूला भील, सदस्य : करिष्मा सिद्धार्थ वाघ, एकनाथ त्र्यंबक पाटील, दीपक जयराम पाटील, सरला सुनील पारधी, अर्जुन सुखदेव कोळी, गोडम भगवान भिल, माधवसिंग भीमसिंग राऊळ, जितेंद्रसिंग कोडसिंग राजपूत, साजेदाबी वहाब शेख, मनीषा देवेंद्र पाटील, संदीप देविदास पाटील, अनिता हिम्मत पाटील, सुनिता महेश वाणी.
खंबाळे : सरपंच सतीबाई आसाराम पावरा, सदस्य : महेश तुकाराम पावरा,बधिभाई रमेश पावरा, चरणसिंग सोमजी पावरा,सुन्याबाई मोहन पावरा, भावसिंग कार्या पावरा, मनीषा सतीश पावरा, राहुल लीलाबाई गवळे, हिरालाल रघुनाथ कोळी, संगीता रतिलाल पारधी, सीमा संजय कोळी, नितेश हिरालाल पावरा, पुनम उदयभान पावरा, वैशाली सुभाष कोळी.
खर्दे पाथर्डे : सरपंच सुशीला काशिनाथ भील, सदस्य : निलाबाई पंडित भील, प्रतिभा दिलीप पाटील, देविदास पंडित पाटील, काशिनाथ उखा भिल, सरिता दिनेश पाटील, संजय अभिमन्यू पाटील.
महादेव दोंदवाडे : सरपंच संगीता किसन पावरा, सदस्य नकला टकला पावरा, वजाबाई रामदास पावरा, पमाबाई शिवा भील, किसन इस्मल पावरा, राजश्री सोनू पावरा, पेरविबाई जेमाल पावरा, बन्सीलाल तोताराम पावरा, शेकलीबाई जगन पावरा, भगवान गाजर्या पावरा.
मांजरोद : सरपंच गोजरबाई श्रावण भिल, सदस्य पुनम मिलिंद बागुल, नंदलाल दामू गुजर, सुनिता गजेंद्रसिंग राजपूत, कलाबाई लखीचंद भिल, नगीनदास शिवराम गुजर,ज्योती भटूसिंग राजपूत, बापू शिवाजी भील,रंजना मधुकर गुजर, सुरेश दादूसिंग राजपूत, अनिल शंकर कोळी, कल्पनाबाई शैलेश गुजर.
तर्हाडकसबे : सरपंच महेश अरुण सावळे, सदस्य: दिलीप देवराम कोळी, धुमाबाई वसंत भिल, दिनेश शंपा कोळी, ताईबाई धनसिंग भिल, तुकाराम संतोष कोळी, लताबाई मनोहर मोरे, मोती घनश्याम भिल, ताईबाई सखा भील,मीराबाई संतोष कोळी.
थाळनेर : सरपंच मेघा संदीप पाटील, सदस्य:- रेखाबाई डोंगर कोळी ,अनिल सुभाष मराठे, अर्चना सुभाष पाटील, प्रदीप सिताराम देवरे, गणेश आधार चौधरी, भारती सुनील धनगर, छाया सुनील शिरसाट ,पूजा प्रकाश भिल, मंगला सुभाष कोळी, दीपक शामसिंग जाधव, प्रतिभा दत्तू कोळी, स्वाती विनोद बागुल, नवनीत भूता वाडीले, सोनाली रुपेश पाटील, मोतीसिंग आना भिल, विलास तानाजी पाटील, छाया संतोष पाटील.
तोंदे : सरपंच राहुल रूपसिंग चौधरी, सदस्य : जिजाबाई भीमराव करनकाळ, बाबुलाल छबु सोनवणे, अण्णा अर्जुन मावची, चंदा बापू प्रतिहार, राजेंद्र भाऊलाल पाटील , हिराबाई विजय प्रतिहार,सुरेश रमण कोळी , सूनंदाबाई भटू कोळी, शोनूबाई बुधा पवार, लक्ष्मण शामराव पाटील, लिलाबाई किसन पाटील.
वरझडी : सरपंच दिलीप शंभू पावरा, सदस्य :बिहारसिंग नरसिंग पावरा, रायजाबाई लालसिंग पावरा, आमश्या मेहता पावरा, तात्या दिपा पावरा, शांतीबाई शांतीलाल पावरा, दशरथ गणा भिल, ललिताबाई भिवराज भिल, सिंधुबाई आसाराम भील,गोविंद शामराव पावरा, बेबीबाई पांगा पावरा, भारती संजय पावरा.
वाघाडी : सरपंच किशोर विठ्ठलराव माळी, सदस्य :- नम्रता मंगेश ठाकूर, अर्जुन वक्रा माळी, गायत्री भैय्या कोळी, संदीप मगन शिरसाठ, राजेंद्र जगन्नाथ पाटील, मंगल दिवाण माळी, सुमनबाई नागो भील, राजेश रावसाहेब पवार, सिमा शशिकांत देशमुख, इंदुबाई प्रभाकर चांभार, विकी जीवन मोरे, चंद्रकला हिम्मत रोकडे, जगदीश रघुनाथ कोळी,सलाम गुलाम मनियार, गायत्री प्रताप कोळी.