थाळनेर येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा

 


शिरपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या थाळनेर तेलबिया उत्पादक सहकारी संस्था आणि आर. एम. फॉस्फेट अँड केमिकल्स प्रा. ली.धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने थाळनेर येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

   या प्रसंगी थाळनेर तेलबिया उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन तथा माजी जि. प. कृषी सभापती श्री. नरेंद्रसिंग जमादार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच आर. एम. फॉस्फेट चे जनरल मॅनजर श्री. जी. पी. शर्मा यांनी शेतकऱ्यांना शेताचे महत्व तसेच प्रेरणादायी संदेश दिला . व प्रोडक्शन मॅनेजर श्री. रणजितसिंग राजपूत यांनी सुपर फॉस्फेट महविरा झिरोन चे विविध पिकातील महत्व सांगितले , तसेच सहा. विभागीय अधिकारी श्री चंद्रदीप राजपूत यांनी शेतकरी दिवसाचे प्रास्ताविक मांडून शेती व्यवसायातील शेतकऱ्याचे महत्व सांगितले. तसेच या कार्यक्रमात परिसरातील प्रगतशील शेतकत्यांचा गौरव करण्यात आला. त्यानं विशेष भेटवस्तू देण्यात आले, यावेळी कंपनीच्या वतीने आयोजित प्रश्नमजुषामध्ये सहभाग घेऊन बरोबर उत्तरे देणाऱ्या तीन शेतकऱ्यांना स्नेहभेट देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात श्री. भोजेसिंग राजपूत (सरपंच जैतपुर), प्रेमासिंग गिरासे अहिल्यापुर, पंकज शिंदे , भोजेसींग जमादार, राजाराम गोधा तेली, रमेशसिंग जमादार, युवराजसिंग राजपूत, संजयसिंग राजपूत आदी उपस्थित होते,श्री. मोहन भामरे यांनी आभार प्रदर्शन केले. भारत राजपूत , विकास चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने