पतंग उडविण्यासाठी शासनाने प्रतिबंधीत केलेला मांजा माल जप्त शिरपुर शहर पो.स्टे. चे डी.बी. पथकाची कारवाई

 






शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातील पतंग उडवण्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेला मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दि. २७.१२.२०२२ रोजी १५.०० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री. ए. एस. आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपुर जि.धुळे येथील पाच कंदील मेनरोडवरील तारण जनरल स्टोअर्स दुकानात इसम नामे रविद्र भगवानदास जैन हा त्याचे दुकानात आगामी सक्रांत सणाचे दिवसात पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधीत असलेला नायलॉन मांजाची विक्री करीत आहे.


त्यावरुन शिरपुर शहर पो.स्टे. चे शोध पथकाचे अंमलदार दोन पंचांसह शिरपुर जि. धुळे शहरातील पाचकंदील मेनरोडवरील तारण जनरल स्टोअर्स गावात जावुन छापा टाकला असता इसम नामे रविंद्र भगवानदास जैन वय ४३ व्यवसाय व्यापार रा. सुमतीनाथ नगर कृष्णा व्हॅली शेजारी करवंद रोड शिरपुर जि. धुळे हा शासनाने नायलॉन मांजा ठेवण्यास व वापरण्यास बंदी घातलेली असतांना सुध्दा तो स्वतःचे आर्थिक फायदयासाठी शासनाने जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन एकुण १०,७४०/-रुपये किमतीचा मांजा माल विक्री करण्यासाठी कब्जात बाळगतांना मिळून आला म्हणुन त्याचेविरुध्द शोध पथकाचे पोका / गोविंद कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पर्यावरण कायदा सन १९८६ चे कलम ५.१५ सह भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. ए. एस. आगरकर, पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग तसंच शोध पथकाचे पोहेकॉ ललित पाटील, लादूराम चौधरी, पोना / मनोज पाटील, पोकों गोविंद कोळी, विनोद अखडमल, प्रविण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार (आर.सी.पी.) अनीमिली आहे.


शासनाने आगामी सक्रांत सणाचे कालावधीत पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधीत असलेला नायलॉन मांजा ठेवण्यास व वापरण्यास बंदी घातली असून कोणीही पतंग उडविण्यासाठी मांजा मालाचा वापर करु नये. जर कोणी पतंग उडविण्यासाठी मांजा माल विक्री करण्यासाठी अगर वापर करीत असल्याचे माहित झाल्यास त्याचेवर पर्यावरण कायदा सन १९८६ चे कलम ५.१५ सह भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे शिरपुर मधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने