शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यातील बोरगांव येथील शेत शिवार रस्त्याची पाहणी जि प सदस्य प्रतिनिधी तथा शिसाका संचालक श्री भरतबापू पाटील व सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या 3054 या योजनेतून वनावल गटातील जि. प. सदस्या सौ अभिलाषा भरत पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे बोरगाव शिवारातील उर्वरित 1 किमी चा शेतरस्ता मंजूर झाला होता ज्याचे भूमिपूजन आमदार श्री काशिराम पावरा यांच्या शुभहस्ते काही दिवसापूर्वी करण्यात आले. कामास प्रारंभ झाला असून झाडं झूडपे काढण्याचे काम चालु आहे त्याची पाहणी करण्यासाठी जि प सदस्य प्रतिनिधी तथा शिसाका संचालक श्री भरतबापू पाटील, सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, जातोडा विकासो माजी चेअरमन सुभाष राजपूत, जातोडा माजी सरपंच जगतसिंग तिरसिंग राजपूत, बोरगांव शेतकरी दीपक राजपूत, साहेबराव गंगाराम भिल, रस्ता कत्राटदार दिग्विजय पाटील व बोरगांव जातोडा शिवारातील शेतकरी उपस्थित होते.
माजी शिक्षण मंत्री श्री अमरिशभाई पटेल, आमदार श्री काशीराम पावरा, प्रियदर्शिनी सूतगिरणी चेअरमन श्री भुपेशभाई पटेल, माजी नगरसेवक श्री अशोक कलाल, माजी नगराध्यक्ष श्री प्रभाकर चव्हाण यांच्या सहकार्यातुन व मार्गदर्शनाखाली वरील शेतशिवार रस्ता मंजूर करण्यात आला आहे.
मागच्या वर्षी जि प सदस्या सौ अभिलाषाताई भरत पाटील यांच्या निधीतूनच 1 किमी चा रस्ता तयार झाला होता, आता उर्वरित 1किमी चा रस्त्याचे काम चालु झाले आहे. बोरगाव शिवारात बोरगाव, जातोडा तसेच हिंगोणी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. शेतात जाण्यासाठी बैल गाडी, ट्रॅक्टर, मोटार सायकल ई ना सोयीचे होणार असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
