बेपत्ता अल्पवयीन मुलाचा अवघ्या १ तासात शोध शिरपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी

 



शिरपूर प्रतिनिधी - बेपत्ता अल्पवयीन मुलाचा अवघ्या १ तासात शोध घेवुन त्याचे आईचे ताब्यात देण्यात शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकास यश आले आहे.


 दि. २७/१२/२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजेचे सुमारास महिला नामे अर्चना सचिन पाटील रा. आनंद शांती नगर मांडळ शिवार शिरपूर जि.धुळे यांनी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात येवून त्यांचा मुलगा नामे वेदांत सचिन पाटील वय १३ वर्ष हा इयत्ता ७ वी मध्ये शिकत असुन तो आज सकाळी ७.३० ते १० वाजेपावेतो राहते घरुन टयुशनसाठी गेला तो घरी परत आलेला नसुन कोठेतरी बेपत्ता झाला असल्याबाबत खबर दिली. त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. ए. एस. आगरकर यांनी लागलीच शोध पथकामार्फत तपासचक्रे फिरविली असता बेपत्ता मुलगा हा करवंद गाव ता. शिरपुर जि. धुळे येथे मिळुन आल्याने त्यास त्याचे आईचे ताव्यात सुखरूप दिले आहे.


सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. ए. एस. आगरकर, पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग तसेच शोध पथकाचे पोहेकॉ ललित पाटील, लादूराम चौधरी, चापोहेकॉ / नासीर पठाण, पोना/मनोज पाटील, पोकों गोविंद कोळी, विनोद अखडमल, प्रविण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार (आर.सी.पी.) अशांनी मिळुन केली आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने